Advertisement

कोरोनामुळे आर्थिक कोंडी, महापालिका जाणार शेअर बाजारात

कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या मुंबई महापालिकेने शेअर बाजारातून कर्ज रोख्यातून (म्युनिसिपल बाँड) पैसे उभारण्याची तयारी सुरू केली आहे.

कोरोनामुळे आर्थिक कोंडी, महापालिका जाणार शेअर बाजारात
SHARES

कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या मुंबई महापालिकेने (bmc) शेअर बाजारातून कर्ज रोख्यातून (म्युनिसिपल बाँड) पैसे उभारण्याची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच प्रशासनाकडून गटनेत्यांच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. या माध्यमातून किमान ४ हजार कोटी रुपये उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे.

जकात नाके जाऊन त्याजागी देशभरात वस्तू आणि सेवा कर लागू होताच महापालिकेच्या उत्पन्नाचा मोठा स्त्रोत आधीच बंद झाला आहे. केंद्राकडून मिळणाऱ्या कर परताव्याच्या माध्यमातून महापालिका सावरत असतानाच कोरोनाच्या (coronavirus) संकटामुळे महापालिकेची आर्थिक कोंडी झाली आहे. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे हजारो कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली रखडली आहे. शिवाय विविध प्रकारची कर वसुली देखील होऊ न शकल्याने  २०२०-२१मध्ये महापालिकेचं सुमारे १० हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यातच कोरोनासंदर्भातील उपाययोजना करण्यासाठी महापालिकेचे सुमारे १६०० कोटी रुपये देखील खर्च झाले आहेत. 

हेही वाचा- राज्यपालांकडे कंगनाला भेटायला वेळ, पण…; शरद पवार संतापले 

उत्पन्नाचे स्त्रोत आटलेले असतानाच येत्या काळात मुंबईतील (mumbai) विकासकामांसाठी पैसे उभे करण्याचं मोठं आव्हान महापालिकेपुढं उभं राहिलं आहे. महापालिकेला रस्ते, पाणी, मलनि:सारण इ. पायाभूत सुविधांच्या कामांसाठी वर्षाला १० ते १२ हजार कोटी रुपये लागतात. तर जीएसटीच्या परताव्यापोटी महापालिकेला केवळ ७ ते ८ हजार कोटी रुपयांचा निधी मिळतो. बँकांमधील महापालिकेच्या मालकीच्या दीर्घ मुदत ठेवी महत्त्वाचे विकास प्रकल्प, कर्मचाऱ्यांचे पेन्शन व इतर कामांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने या मुदत ठेवींना हात लावता येत नाही. त्यामुळे महापालिकेने आता कर्ज रोख्यांच्या माध्यमातून शेअर बाजारातून निधी उभारण्याचा विचार केला आहे.

याआधी पुणे, अहमदाबाद, लखनऊ अशा महापालिकांनी कर्ज रोख्यांच्या माध्यमातून विकासनिधी उभारलेला आहे. दोन महिन्यांपूर्वीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबई शेअर बाजारात उपस्थित राहून लखनऊ महापालिकेच्या कर्ज रोख्यांचं अनावरण केलं होतं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा