Advertisement

विक्रोळी स्थानकाशेजारील मासे विक्रेत्यांवर रेल्वेची कारवाई


विक्रोळी स्थानकाशेजारील मासे विक्रेत्यांवर रेल्वेची कारवाई
SHARES

राज ठाकरे यांनी रेल्वे पूल आणि स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर १५ दिवसांत कारवाई करण्याची मुदत रेल्वे प्रशासनाला दिल्यानंतर रेल्वेने धडक कारवाई हाती घेतली आहे. दादरपाठोपाठ आता विक्रोळी रेल्वे स्थानक परिसरातील मासे विक्रेते तसेच फेरीवाल्यांवर कारवाई करून स्थानक परिसर साफ करण्यात आला.


पर्यायी जागा देऊनही...

विक्रोळी पूर्वेकडील रेल्वे स्थानक मार्गावर सुमारे ३० ते ३५ मासे विक्रेते बसत असून यामुळे नागरिकांना चालण्यास आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची प्रवाशांची तक्रार होती. तरीही, मागील अनेक वर्षांपासून बिनदिक्कत हे फेरीवाले बसत होते. या फेरीवाल्यांना यापूर्वी हटवून कांजूर मार्ग येथे जागा देण्यात आली. तरीही येथे हे मासे विक्रेते बसत होते. अखेर या सर्व मासे विक्रेते आणि फेरीवाल्यांवर रेल्वेच्या आरपीएफ व सामान्य रेल्वे पोलीसांनी कारवाई केली.



पुन्हा बसणार नाही, याची काळजी घेणार

रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांसह मासे विक्रेत्यांवर कारवाई केल्यामुळे स्थानक परिसर मोकळा झाला असून याठिकाणी पुन्हा मासे विक्रेते तसेच फेरीवाले बसणार नाही याची काळजी रेल्वेच्यावतीने घेतली जाईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान कारवाईनंतर विक्रोळी रेल्वे स्थानकाशेजारी मच्छी बाजार उठवण्यात आल्यानंतर येथील कोळी बांधव मासे विक्रेत्यांना विक्रोळीत बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे स्थानिक शिवसेना नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी स्पष्ट केले.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा