Advertisement

मुंबईतील 'या' परिसरातील पाणीपुरवठा बंद

जलवाहिनी जोडणीचं काम १८ जानेवारीला दुपारी १२ वाजल्यापासून १९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.

मुंबईतील 'या' परिसरातील पाणीपुरवठा बंद
SHARES

मुंबईतील धारावी इथं १५०० मिमी व्‍यासाच्या आणि १४५० मिमी व्‍यासाच्या अप्‍पर वैतरणा जलवाहिनी जोडण्यात येणार आहे. या जोडणीच्‍या कामामुळं १८ ते १९ जानेवारी हे २ दिवशी वांद्रे आणि धारावी येथील काही भागांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. वांद्रे इथं २४ तास, तर धारावीत अंशत: पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

जलवाहिनी जोडणीचं काम १८ जानेवारीला दुपारी १२ वाजल्यापासून १९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. एकूण २४ तास या जलवाहिनीच्या जोडणीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळं रहिवाशांनी आधीच्या दिवशी पाण्याचा साठा करून ठेवावं ते जपून वापरावं, असे आवाहन महापालिकेनं केलं आहे.

जी-उत्तर विभागातील धारावी मेन रोड, गणेश मंदिर रोड, ए. के. जी. नगर रोड, कुंभारवाडा, संत गोरा कुंभार रोड व दिलीप कदम मार्ग या परिसरात १८ जानेवारी रोजी संध्याकाळी ४ ते रात्री ९ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

जी-उत्तर विभागातील प्रेम नगर, नाईक नगर, ६० फूट रोड, जस्मिन मिल रोड, माटुंगा लेबर कॅम्प, ९० फूट रोड, एम. जी. रोड, धारावी लूप रोड, संत रोहिदास मार्ग या परिसरातील १९ जानेवारी सकाळी ४ ते दुपारी १२ पर्यंत पुरवठा बंद राहणार आहे. त्याशिवाय, एच-पूर्व विभागात १८, १९ जानेवारी रोजी २४ तासांसाठी पुरवठा बंद राहणार आहे.


हेही वाचा -

मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळाला तडा

मुंबईत गारठा वाढला, पारा १२.३ अंशापर्यंत घसरला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा