पालिका रूग्णालयात उपचार महागणार, २० टक्के शुल्कवाढ मंजूर

सभागृहनेते यशवंत जाधव यांनी ५० टक्के शुल्काऐवजी हे शुल्क २० टक्के एवढे करण्यात यावे, अशी मागणी उपसूचनेद्वारे केली. त्यानंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रस्ताव मंजूर केला असून आता लवकरच हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर नव्या शुल्काची आकारणी करण्यात येणार आहे.

  • पालिका रूग्णालयात उपचार महागणार, २० टक्के शुल्कवाढ मंजूर
SHARE

मुंबई महापालिका रुग्णालयांच्या शुल्कांमध्ये २० टक्के वाढ करण्यात आली असून याला सत्ताधारी पक्षाने मंजुरी दिली आहे. प्रशासनाने ५० टक्के शुल्कवाढीचा प्रस्ताव मांडला होता. परंतु, गटनेत्यांनी ही शुल्कवाढ २० टक्के एवढीच करण्याची मागणी उपसूचनेच्या माध्यमातून करत याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचाराचा खर्च वाढणार आहे.


५० टक्क शुल्कवाढीचा होता प्रस्ताव

केईएम, शीव, नायर यासह महापालिकेची १७ उपनगरीय व विशेष रुग्णालये असून या सर्व रुग्णालयांमध्ये मुंबईसह देशभरातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारांसाठी येत असतात. या बाहेरून येणाऱ्या रुग्णांमुळे महापालिकेच्या आरोग्य सेवेवर ताण पडत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने रुग्णालयातील आरोग्य सेवेचे शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सध्या असलेल्या शुल्काच्या तुलनेत ५० टक्के शुल्क वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने गटनेत्यांच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला होता.ना सुविधा, ना सुधारणा, मग शुल्कवाढ का?

यापूर्वी २०१२मध्ये हे शुल्क वाढवण्यात आले होते. त्यामुळे पाच वर्षांनी ही शुल्कवाढ करण्याचा प्रस्ताव मंजुरीला आला होता. मात्र, 'महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुधारणा नाहीत की याबाबतच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. मग अशा प्रकारे शुल्कवाढ करण्यास आमचा विरोध असल्याचे' विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव, सपाचे रईस शेख आदींनी सभागृहात सांगितले.


आकारणी कमी आणि खर्च जास्त

परंतु, यावर अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी महापालिकेच्या रुग्णालयातील प्रत्येक रुग्णावर करण्यात येणारा खर्च व आकारण्यात येणारे शुल्क याची आकडेवारी सांगत आरोग्य सेवेवरील महसूल आणि खर्चाचा लेखाजोखा मांडला. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनीही हे शुल्क वाढवणे गरजचे असल्याचे सांगितले. तसेच, जे शुल्क वाढवू ते आरोग्य विभागावरच खर्च करू असेही आश्वासन दिले.


अखेर २० टक्के शुल्कवाढीला मंजुरी

सभागृहनेते यशवंत जाधव यांनी ५० टक्के शुल्काऐवजी हे शुल्क २० टक्के एवढे करण्यात यावे, अशी मागणी उपसूचनेद्वारे केली. त्यानंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रस्ताव मंजूर केला असून आता लवकरच हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर नव्या शुल्काची आकारणी करण्यात येणार आहे.हेही वाचा

पुढील आठवड्यापासून सरकारी रूग्णालयातील उपचार महागणार


संबंधित विषय
ताज्या बातम्या