Advertisement

रेल्वेने खणलेल्या खड्डयात पडून मुलाचा मृत्यू


रेल्वेने खणलेल्या खड्डयात पडून मुलाचा मृत्यू
SHARES

सांताक्रूझ पूर्वेकडील गोळीबार रोडजवळ रेल्वेच्या जागेत खोदलेल्या खड्डयात पडून एका १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलगा खड्ड्यात पडल्यावर त्याला स्थानिकांनी त्वरीत रुग्णालयात दाखल केले. परंतु दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. साकिर शेख असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे.

सांताक्रूझ गोळीबार रोडवर शिवशक्ती इमारत एसआरए इमारत क्रमांक १२ च्या बाजूला रेल्वेच्या जागेवर खोदलेल्या खड्डयात गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास साकिर पडला. हा खड्डा १० ते १२ फूट खोल होता. खड्ड्यात पूर्णपणे पाणी भरलेले होते. खड्डयात मुलगा पडल्याची बाब निदर्शनास येताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिक रहिवाशांनी त्या मुलाला बाहेर काढले आणि जवळच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात नेले. परंतु या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता.

साकिर खेळत असताना खड्ड्यात पडला की चुकून पडला याबाबत कुणालाच काही माहीत नाही. त्यामुळे साकिर या खड्डयात कसा पडला? याचा तपास स्थानिक पोलिसांमार्फत केला जात आहे.



हेही वाचा -

चांदिवलीतील शाळेत खेळताना एका विद्यार्थ्याचा मृत्यू 



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा