Advertisement

रस्त्यांच्या कामांसाठी पुन्हा जुन्याच सल्लागारांची निवड

ज्या सल्लागारांचे मंडळ स्थापन करून ज्यांच्याकडून सल्लासेवा घेतली जाणार आहे, त्याच सल्लागारांच्या देखरेखीखाली मुंबईतील रस्ते मागील २०१४पासून तयार केले जात आहेत. याच कालावधीत केलेल्या रस्त्यांच्या बांधकामांमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघडही झाले आहे.

रस्त्यांच्या कामांसाठी पुन्हा जुन्याच सल्लागारांची निवड
SHARES

रस्ते बांधकामातील घोटाळा ज्या सल्लागारांच्या देखरेखीखाली झाल्याची प्रकरणे समोर आली, एवढेच काय, तर सल्लागारांनी बनवलेल्या आराखड्यानंतरही स्थायी समितीने मंजूर केलेल्या अनेक रस्त्यांची कामे वगळण्यात आली, अशा सल्लागारांवर पुन्हा महापालिका प्रशासन विश्वास टाकायला निघाली आहे. रस्त्यांच्या डांबर आणि सिमेंट क्रॉक्रिटीकरणासाठी पुढील तीन वर्षांसाठी पुन्हा जुन्या पाच सल्लागार कंपन्यांचीच निवड प्रशासनाने केली आहे. स्थायी समितीच्या सदस्यांनी याअगोदर सल्लागारांविरोधात आवाज उठवलेला असतानाच आता या पाच सल्लागारांना ते महापालिकेत स्थान देतात का? यावर आता सर्वांचे लक्ष आहे.


या पाच सल्लागारांची निवड

मुंबईतील डांबरी आणि सिमेंट कॉक्रीट रस्त्यांची सुधारणा, दुरुस्ती, व संकल्पचित्रे व अंदाजपत्रके तयार करण्यासाठी पुढील तीन वर्षांसाठी सल्लागारांची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी श्रीखंडे प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स टेक्नोजेम कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स कन्स्टुमा कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स प्रोजेक्ट कन्सल्टिंग इंडिया व मेसर्स टंडन अर्बन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या पाच सल्लागारांची निवड करून त्यांचे एक सल्लागार मंडळ तयार करण्यात आले आहे.



या सल्लागारांच्या माध्यमातून पर्जन्य व मलवाहिनी विभागाचे अभिप्राय घेणे, टोपोग्राफी सर्व्हे, चाचणी खड्डे घेणे, भूचाचणी करणे, सविस्तर मोजमापे घेऊन महापालिकेच्या दरानुसार रस्ते व संबंधित बांधकामांचे अंदाजपत्र व संकल्पचित्र बनवणे, फरसबंदी, पदपथ यांचे जाळे सशक्त करणे, वाहनांचे सर्व्हेक्षण करणे आदी प्रकारची कामे केली जाणार आहेत.


भ्रष्टाचार उघड होऊनही त्यांचीच निवड

विशेष म्हणजे ज्या सल्लागारांचे मंडळ स्थापन करून ज्यांच्याकडून सल्लासेवा घेतली जाणार आहे, त्याच सल्लागारांच्या देखरेखीखाली मुंबईतील रस्ते मागील २०१४पासून तयार केले जात आहेत. याच कालावधीत केलेल्या रस्त्यांच्या बांधकामांमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघडही झाले आहे. मात्र, तरीही त्याच सल्लागारांवर महापालिकेच्या वतीने पुन्हा मेहेरबानी दाखवली जात आहे.



सल्लागार-कंत्राटदार मिलीभगत?

मागील दोन वर्षांमध्ये याच सल्लागाराने सर्व तपासणी करून रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली होती. त्यातील स्थायी समितीने मंजुरी दिलेल्यांपैकी तब्बल ३९ रस्त्यांची कामे वगळण्यात आली. त्यामुळे सल्लागार हे केवळ नावापुरतेच असून ते कंत्राटदारांना प्रेरक अशी कामे करत असतात.


'हुशार अभियंत्यांची निवड करा'

महापालिकेकडून पैसे घ्यायचे आणि कंत्राटदारांना मदत करायची, हेच आजवरच्या कामांवरून दिसून आले आहे. त्यामुळे अशा सल्लागारांना कामे न देता रस्ते विभागातील हुशार अभियंत्यांची निवड करून त्यांच्यामार्फतच ही कामे केली जावीत, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली आहे.



हेही वाचा

सर्वच सांडपाणी प्रक्रिया केंद्रांवर देखरेखीसाठी सल्लागार मंडळ


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा