
मुंबईत मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरींनीच बुधवारी सकाळी अंधेरी सबवे बंद करण्याची वेळ आली. तर दुसरीकडे पालिकेने Brihanmumbai Municipal Corporation (BMC) ने गाळ काढण्याचे लक्ष्य 100 टक्क्यांहून अधिक पूर्ण केल्याचा दावा केला आहे. तसेच पूरस्थिती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्याचेही महापालिकेने सांगितले.
महापालिकेनुसार, मुंबईभरात 547 डिवॉटरिंग पंप बसवण्यात आले असून ते आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या केंद्रीय मॉनिटरिंग डॅशबोर्डशी जोडण्यात आले आहेत. याशिवाय रेल्वेकडून आणखी 403 पंप बसवण्यात आले असून शहरातील एकूण पूरप्रतिसाद यंत्रणा जवळपास 950 पंपांपर्यंत पोहोचली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व पोर्टेबल पंप आता IoT आधारित प्रणालीने सुसज्ज आहेत. त्यामुळे स्मार्टफोन आणि केंद्रीय नियंत्रण कक्षातून त्यांचे रिअल-टाइम निरीक्षण आणि रिमोट ऑपरेशन शक्य होणार आहे.
BMC च्या आकडेवारीनुसार, 3 जूनपर्यंत मुंबईतील गाळ काढण्याचे काम 104.79 टक्के पूर्ण झाले आहे. बेट भाग आणि पश्चिम उपनगरांत 100 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला असून, पूर्व उपनगरांत हे प्रमाण 93.56 टक्के आहे. तर मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम 73.55 टक्के पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.
मात्र या दाव्यांवर विविध पक्षांच्या नगरसेवकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रत्यक्षात नाले आणि गटारांची स्थिती पाहता अधिकृत आकडेवारी वास्तव दर्शवत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
2026-27 च्या अर्थसंकल्पात गाळ काढण्याच्या कामांसाठी ₹27 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी चेंबूर, देवनार आणि गोवंडीचा समावेश असलेल्या झोन 5 साठी ₹12.7 कोटी मंजूर करण्यात आले आहेत.
अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर (Abhijit Bangar) यांनी गाळ काढण्याच्या प्रक्रियेत काही अडचणी आल्याचे मान्य केले. काही कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला नाही किंवा काम पूर्ण केले नाही, असे त्यांनी सांगितले.
भांडुप ते विक्रोळी दरम्यानच्या एस वॉर्डमध्ये लहान नाल्यांतील गाळ काढण्याचे काम अधिकृत नोंदीनुसार केवळ 15.92 टक्के पूर्ण दाखवले असले, तरी प्रत्यक्षात पर्यायी व्यवस्थेद्वारे बहुतेक काम पूर्ण झाल्याचा दावा बंगार यांनी केला.
“येथे एका स्वयंसेवी संस्थेमार्फत मजूर उपलब्ध करून घेतले आणि BMC ची स्वतःची वाहने वापरून गाळ हटवण्यात आला. त्यामुळे प्रत्यक्ष काम पूर्ण झाले असले तरी कंत्राटदार नसल्याने आकडेवारीत ते दिसत नाही,” असे बांगर म्हणाले.
सध्या मुंबईत पूरप्रवण म्हणून 496 ठिकाणे ओळखली गेली आहेत. त्यापैकी 403 ठिकाणांवरील समस्या सोडवण्यात आल्या असून उर्वरित 93 पैकी केवळ 13 ठिकाणांची कामे मान्सूनपूर्व पूर्ण होऊ शकतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
2025 च्या मान्सूनमध्ये झालेल्या अनपेक्षित पाणी साचण्याच्या घटनांनंतर दक्षिण मुंबईतील चर्चगेट (Churchgate), ओव्हल मैदान (Oval Maidan), मेट्रो सिनेमा जंक्शन, कॅम्पस कॉर्नर (Cemps Corner) आणि हुतात्मा चौक (Hutatma Chowk) या भागांचाही पूरप्रवण यादीत समावेश करण्यात आला आहे.
मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून BMC ने सहा मोठी आणि दहा मिनी पंपिंग स्टेशन्स सुरू केली आहेत. तसेच 3,000 हून अधिक आपत्कालीन रुग्णालयीन खाटा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. डास नियंत्रण मोहिमा आणि मोठ्या प्रमाणावर झाडांची छाटणीही करण्यात आली आहे.
शहरातील अत्यंत धोकादायक C1 श्रेणीतील 174 इमारतींपैकी 72 इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत, तर 71 इमारतींवरील कारवाई न्यायालयीन आदेशांमुळे रखडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा
