Advertisement

उद्यानं खुली राहणार का? पालिकेनं दिलं 'हे' उत्तर

आता यासंदर्भात पालिकेनं निवेदन काधत माहिती दिली आहे. यामुळे नागरिकांचा संभ्रम दूर होण्यास मदत होईल.

उद्यानं खुली राहणार का? पालिकेनं दिलं 'हे' उत्तर
SHARES

महाराष्ट्र सरकारनं ३ ऑगस्टच्या ब्रेक द चेन अंतर्गत लागू निर्बंध शिथिल केले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक उद्यानं व्यायाम, जॉगिग आणि चालण्यासाठी खुली करण्यात आली आहेत. पण पालिकेच्या उद्यानांबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे.

आता यासंदर्भात पालिकेनं निवेदन काधत माहिती दिली आहे. पालिकेनुसार, उद्यानं फक्त सकाळीच उघडतील.

पालिकेनं म्हटलं आहे की, त्याच्या सुधारित आदेशानुसार इनडोअर आणि आऊटडोअर स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीला परवानगी दिली जाईल. गार्डन्स स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीसाठी आवश्यक नाहीत. पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, "उद्यानाच्या वेळेचं नियमन पूर्वीच्या आदेशानं केलं जाईल. त्यानुसार सकाळी ५ ते सकाळी ९ पर्यंत उद्यानं खुले असतील."

जुहूच्या नगरसेविका रेणू हंसराज यांनी सांगितलं की, मंगळवारी बागेच्या वेळेबाबत स्पष्टता नव्हती. “आम्हाला सुरुवातीला वाटलं की पूर्ण दिवस उद्यानं उघडण्यास परवानगी दिली गेली आहे. पण नंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वेळ अजूनही सकाळपर्यंत मर्यादित आहे. समुद्रकिनाऱ्यांच्या बाबतीत (जुहू सारखे) आम्हाला समजतं की, तेथे गर्दी जमा होऊ शकते, परंतु सार्वजनिक बागांमध्ये अनेक स्थानिक लोक त्यांना फिरायला, जॉगिंग आणि रोजच्या व्यायामासाठी येत असतात, ”हंसराज म्हणाले.

वांद्रे इथले नगरसेवक आसिफ झकेरिया म्हणाले की, “खूप गोंधळ झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी जॉगर्स पार्कबाहेर जमलेल्या लोकांना परत पाठवण्यात आलं.

ओव्हल ट्रस्टच्या विश्वस्त नयना काठपलिया म्हणाल्या की, सार्वजनिक उद्यानं उघडी ठेवली पाहिजेत, पण मोठ्या गर्दीचे नियमन कसे करावे हा प्रश्न आहे.

कोरोना साथीची दुसरी लाट ओसरू लागल्यानं मुंबईतील दुकानं आणि आस्थापना मंगळवारपासून आठवड्याचे सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. औषधाची दुकानं २४ तास खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु हॉटेल्स मात्र दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील. सरकारी आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं सुरू राहणार आहेत.

उपाहारगृहे दुपारी ४ पर्यंतच खुली राहतील, तर धार्मिकस्थळे, सिनेमा आणि नाट्यगृहे बंदच राहणार आहेत. पुण्यासह ११ जिल्ह्यांमध्ये मात्र सध्या लागू असलेले निर्बंध कायम राहतील.हेही वाचा

सांडपाण्याची होणार आरटी-पीसीआर चाचणी, नमुन्यातून संसर्ग तपासणार

मुंबई, ठाण्यातील मॉल राहणार बंद!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा