Advertisement

क्लिनअप मार्शलची दंडवसुली ऑनलाईन?

कर्मचाऱ्यांकडून केली जाणारी अरेरावी, उद्धट वर्तन आणि लाचखोरी यांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

क्लिनअप मार्शलची दंडवसुली ऑनलाईन?
SHARES

मास्कविना फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्यासाठी नेमलेल्या क्लीनअप मार्शलबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. या कर्मचाऱ्यांकडून केली जाणारी अरेरावी, उद्धट वर्तन आणि लाचखोरी यांना आळा घालण्यासाठी ही दंडवसुली प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे.

कोरोनाला आळा घालण्यासाठी मास्क बंधनकारक करण्यात आलं आहे. पण बरेच जण मास्कविना फिरत असल्याचं आढळलं. त्यामुळे मास्कविना फिरणाऱ्यांकडून २०० रुपये वसूल करण्याचं ठरलं. यासाठी क्लिनअप मार्शल निवडण्यात आले. पण यांच्याविरोधात अनेक तक्रारी येऊ लागल्या.

अनेक ठिकाणी गणवेष न घातलेले तोतया क्लीनअप मार्शलकडून दंडवसुलीच्या नावाखाली पैसे उकळत असल्याची प्रकरण समोर येऊ लागली. कधी कधी खोटय़ा पावत्या तयार करून लोकांना फसवण्याचे प्रकारही घडत असल्याचं उघड झालं. तर कधी २०० रुपये दंडाची रक्कम टाळण्यासाठी नागरिकांकडूनही कमी पैसे देऊन स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी लाच देण्याचे प्रकार घडत आहेत.

गणवेश न घातलेले मार्शल दिसल्यास तक्रार करावी असं आवाहनही पालिकेनं केलं आहे. या सगळय़ावर उपाय म्हणून लोकांकडून रोख दंडवसुलीची पद्धत बंद करता येईल का, याचा विचार पालिका प्रशासन करत आहे. मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीनं दंडाची रक्कम वसूल करता येईल का, याचा विचार सुरू आहे.



हेही वाचा

शाळा कॉलेज सुरू; मात्र रेल्वेचे दार अद्याप बंदच

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी 'चाकावरचे उपाहारगृह'

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा