Advertisement

मास्क न घालणाऱ्यांकडून पालिकेनं केला 'इतका' दंड वसूल

मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई ९ एप्रिल २०२० पासून नियमितपणे करण्यात येत आहे.

मास्क न घालणाऱ्यांकडून पालिकेनं केला 'इतका' दंड वसूल
SHARES

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेद्वारे मास्क बंधनकारक करण्यात आले. जर मास्क घातला नसेल तर १००० रुपये दंड देखील वसूल केला जातो. पण तरीही बरेच नागरिक मास्क वापरत नाहीत. अशा नागरिकांवर महापालिकेनं कारवाई केली आहे.

मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई ९ एप्रिल २०२० पासून नियमितपणे करण्यात येत आहे. ९ एप्रिल २०२० ते ३१ ऑगस्ट २०२० दरम्यान 'मास्क' न लावता सार्वजनिक ठिकाणी आढळून आलेल्या २ हजार ७९८ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून जवळपास २७ लाख ४८ हजार ७०० एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत असलेली विना 'मास्क' विषयक दंडात्मक कारवाई ही विभागास्तरावर करण्यात येत आहे. ९ एप्रिल ते ३१ ऑगस्ट या सुमारे ५ महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक रक्कम वसुलली गेली. ५ लाख ४ हजार असा हा आकडा आहे.

'के पश्चिम' विभागाद्वारे ही दंड वसूली केली गेली आहे. त्या खालोखाल ४ लाख २१ हजार इतका दंड 'आर दक्षिण' विभागात तर ४ लाख ८ हजार ५०० इतका दंड 'सी' विभागाद्वारे वसूल करण्यात आला आहे.

पालिकेच्या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणी 'मास्क' वापरणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कारवाईचा सकारात्मक परिणाम होऊन काही प्रमाणात ‘कोविड –19’ चा प्रसार रोखण्‍यातही मदत होत आहे. या अनुषंगानं नागरिकांनी घराबाहेर पडताना आवर्जून 'फेस-मास्क' घालूनच बाहेर पडावं, असं आवाहन घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत आहे.हेही वाचा

डोंगरी इमारत दुर्घटना : ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू

मुंबईत मलेरियाचा प्रादुर्भाव वाढताच

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा