Advertisement

अखेर आयुक्तांना शहाणपण सुचलं, कार्यकारी अभियंतांच पदनिर्देशित अधिकारी

अनधिकृत बांधकामांवर कनिष्ठ पदावरील अभियंत्यांकडून ठोस कारवाई होत नसल्यामुळे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ही जबाबदारी कार्यकारी अभियंता पदाच्या अभियंत्यावर निश्चित केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही मागणी होत होती.

अखेर आयुक्तांना शहाणपण सुचलं, कार्यकारी अभियंतांच पदनिर्देशित अधिकारी
SHARES

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी सहायक आयुक्तांऐवजी कार्यकारी अभियंत्यांच्या खांद्यावर पदनिर्देशित अधिकारी पदाची धुरा सोपवली आहे.


अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी

मुंबईच्या अनेक भागांमध्ये होणारी अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण यावर प्रभावीपणे कारवाई करण्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयांमधील पदनिर्देशित अधिकारी (Designated Officer) पदे निर्माण केली आहेत. प्रत्यक्षात विभागाचा पदनिर्देशित अधिकारी म्हणून विभागाचा सहायक आयुक्त यांच्यावरच जबाबदारी निश्चित केली जावी, अशा स्पष्ट सूचना असतानाही महापालिकेच्या तत्कालिन आयुक्तांनी या पदाची जबाबदारी कनिष्ठ अभियंता (जेई), सहाय्यक अभियंता (एई), दुय्यम अभियंता (एसई) यांच्यावर सोपवून सर्व बड्या अधिकाऱ्यांना मोकळं सोडून दिलं होतं.


आयुक्तांचा निर्णय

परंतु या कनिष्ठ पदावरील अभियंत्यांकडून ठोस कारवाई होत नसल्यामुळे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ही जबाबदारी कार्यकारी अभियंता पदाच्या अभियंत्यावर निश्चित केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही मागणी होत होती.


कारवाईला मर्यादा

मुंबई महापालिका क्षेत्रातील अतिक्रमणे असोत किंवा अनधिकृत बांधकामे असोत, त्यांच्या विरोधात मुंबई महापालिका प्रशासनाच्यामाध्यमातून कारवाई करण्यात येत असते. या कारवाईचे नियोजन व व्यवस्थापन योग्यप्रकारे व्हावं म्हणून प्रत्येक विभागात 'पदनिर्देशित अधिकारी' अशी स्वतंत्र पदे निर्माण केली आहे. मात्र, या पदावर यापूर्वी कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता, दुय्यम अभियंता यासारख्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या नियुक्ती होत होत्या. किंबहुना त्यांच्याकडे पदभार सोपविला जात होता. त्यामुळे बऱ्याचदा अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम विरोधातील प्रत्यक्ष कारवाईत मर्यादा येत असत.


जबाबदारी निश्चित

या सर्व बाबी लक्षात घेऊन यापुढे ‘कार्यकारी अभियंता’ (Executive Engineer) या स्तरावरील व्यक्तीचीच नियुक्ती ‘पदनिर्देशित अधिकारी’ या पदावर करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या पदावर नियुक्त होणारी व्यक्ती ही ‘कार्यकारी अभियंता’ या स्तरावरील असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्याचबरोबर ज्या विभागांमध्ये ‘पदनिर्देशित अधिकारी’ हे पद रिक्त असेल किंवा ‘पदनिर्देशित अधिकारी’ रजेवर असेल, तर त्या विभागांमध्ये या पदाचा कार्यभार हा त्या विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे देण्याचाही निर्णय घेण्यात घेण्यात आहे.



हेही वाचा-

पश्चिम उपनगरांतील 'या' भागात येत्या मंगळवारी पाणी येणार नाही!

स्वस्त पेट्रोलसाठी दारू महागणार?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा