Advertisement

स्वस्त पेट्रोलसाठी दारू महागणार?


स्वस्त पेट्रोलसाठी दारू महागणार?
SHARES

मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढत आहे. मात्र यासर्वांचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. आता यावर मात करण्यासाठी सरकार दारू महाग करण्याच्या विचारात आहे.


प्रस्ताव तयार

राज्यात देशी बनावटीच्या विदेशी दारूची मागणी वाढली आहे. शिवाय 2013 पासून या विदेशी दारूवरील एक्साईज ड्युटीत वाढ झालेली नाही. दरम्यान याकडे एक्साईजच्या अधिकाऱ्याचं लक्ष वेधलं. या विदेशी दारूवरील एक्साईज ड्युटी वाढवण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवण्यात आला असल्याचं एक्साईज अधिकाऱ्याने सांगितलं. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी होऊन ते स्वस्त होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

जर राज्य सरकारने विदेशी दारूवरील एक्साईज ड्युटी वाढवल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होतील, यामुळे महागाई दूर होण्यास नक्कीच मदत होईल.


हेही वाचा - 

वाईन इज शाईन!

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य हैराण, नितीन गडकरी यांची कबुली

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा