Advertisement

वाईन इज शाईन!

बीअर आणि लिकर (मद्य)च्या जगात वाईननं आजही आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं आहे. एका ग्रीक कवीनुसार वाईन मनाचा आरसा आहे. वाईन अॅण्ड डाईन संस्कृती तसं बघायला गेलं तर मुंबईत हळूहळू रुजू झाली आहे.

वाईन इज शाईन!
SHARES

बीअर आणि लिकर (मद्य)च्या जगात वाईननं आजही आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं आहे. एका ग्रीक कवीनुसार वाईन मनाचा आरसा आहे. वाईन अॅण्ड डाईन संस्कृती तसं बघायला गेलं तर मुंबईत हळूहळू रुजू झाली आहे. रेड, व्हाईट आणि गुलाबी असे काही वाईनचे प्रकार सर्वांनाच माहीत आहेत. पण आरोग्य चांगलं रहावं म्हणून अनेकजण रेड वाईनला आपल्या जीवनशैलीत आवर्जून सहभागी करतात.

२८ ऑगस्ट हा राष्ट्रीय रेड वाईन दिवस म्हणून ओळखला जातो. या दिनानिमित्त वाईनचा इतिहास, त्याची निर्मिती आणि फायदे-तोटे याची माहिती आम्ही देत आहोत.


प्राचीन पेय

हजारो वर्षांपासून वाईन आणि तिची परंपरा विकसित झाली आहे. पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मते जॉर्जियामध्ये इ.स. पूर्व 6000 आणि नंतर इराणमध्ये इ. स. पूर्व 5000 च्या सुमारास वाईनचे संदर्भ सापडले आहेत.


वाईनला रेड कलर कसा येतो?

वाईनला रेड वाईन म्हणत असले तरीही ही फक्त लाल नसते. काळपट, गडद लाल, लालसर, रुबी रेड, जांभळट, मरून अशा विविध रंगछटांमध्ये मिळते. याचे कारण म्हणजे द्राक्षाची प्रजात, ज्यापासून ती वाईन बनते. या वेगवेगळ्या प्रजातीच्या द्राक्षांचा एक खास रंग असतो जो लाल, गडद, जांभळ्या आणि निळसर अशा रंगछटांपासून नैसर्गिकरीत्या मिळालेला असतो.

रेड वाईनला द्राक्षाच्या गरामुळे नाही, तर त्याच्या सालीमुळे रंग येतो. वाईन बनवताना द्राक्षे मोठ्या पात्रात रस काढण्यासाठी क्रश केली जातात तेव्हा द्राक्षासोबत साल देखील क्रश होते. वाईन बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या द्राक्षाच्या सालीचा रसाबरोबर संपर्क होऊ देण्याचा कालावधी प्रत्येक वायनरीचा सीक्रेट फॉर्म्युला आणि रेसिपी यावर अवलंबून असते. या साली फर्मेटेंशन प्रक्रियेत नैसर्गिक यीस्टचंही काम करतात. या प्रक्रियेत द्राक्षाच्या सालीतले टॅनीन त्या रसात मिसळलं जातं. हे टॅनीनच वाईनला एक पोत देते.


रेड वाईनचे फायदे

  1. वाईनच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते. यामुळे पोटातील जंतूंचा नाश होतो. फक्त वाईन योग्य प्रमाणात प्यायावी. 
  2. कोलेस्ट्रॉलचा त्रास असलेल्यांनी वाईनचे सेवन करावे. वाईनमुळे शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रॉल नष्ट होते.
  3. रेड वाईन वाढत्या वयात होणारे डिमेंशिया आणि अल्जाईमरसारख्या आजारांपासून दूर ठेवते.
  4. वाईन नियमित प्यायल्यानं तरूणींमध्ये होणारी ब्रेस्ट कँसरची शक्यता कमी केली जाऊ शकते. यामध्ये उपलब्ध असणारे ग्यूरसिटीन, लंग कँसरपासून वाचवते.
  5. रेड वाईनमधील अँटी ऑक्सीडेंट तत्व बॉडीसाठी फायदेशीर आहे. चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकूत्या आणि एजिंगची समस्या दूर करण्यासाठी रेड वाईन फायदेशीर आहे.
  6. रेड वाईनमुळे हाडे मजबूत होतात.
  7. हिवाळ्यात नेहमी सर्दीची समस्या कायम असते ज्यामुळे श्वास घेण्यास अडचण येते. योग्य प्रमाणात रेड वाईनच्या प्यायल्यानं सर्दीची समस्या कमी होते.
  8. रात्री झोप न येण्याची समस्या असेल तर रेड वाईन प्यायल्यानं फायदा होईल. यामध्ये उपलब्ध मेलाटोनिन चांगली झोप येण्यास मदत करते.
  9. दातांची चमक कायम ठेवण्यासाठी रेड वाईन सेवन करणं फायदेशीर आहे. हे दातांच्या इनेमलला स्ट्राँग बनवते आणि बॅक्टेरीयाला नष्ट करते. यामुळे तोंडाच्या दुर्गंधीची समस्या दूर करते. वाईनमुळे हिरड्यांची सूज देखील कमी होते.

सर्वात महत्त्वाची एक गोष्ट वाईन जर तुम्ही योग्य प्रमाणात घेतली तरच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण वाईनचं अतिसेवन आरोग्यासाठी कदापी चांगलं नाही.



हेही वाचा- 

बिअरनंतर घ्या 'टॅप वाईन'चा आस्वाद!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा