Advertisement

आयुक्त बोले, हॉटेल संघटना डोले!


आयुक्त बोले, हॉटेल संघटना डोले!
SHARES

कमला मिल कम्पाउंड आगीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व हॉटेल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांना यावेळी अग्निसुरक्षा, आरोग्य व इमारतीबाबत असणा-या विविध नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच, या नियमांचे पालन न करणाऱ्यांना संघटनांनी सदस्यत्व देऊ नये, अशाही सूचना केल्या. विशेष म्हणजे आयुक्तांच्या या सूचनांवर हॉटेल संघटनांनी मान डोलवत त्यांचा स्वीकार करण्याची तयारी दर्शवली आहे.


हॉटेल सुरक्षेसाठी महापालिका प्रयत्नशील

मुंबईतील उपहारगृहांमध्ये (हॉटेल) अग्निसुरक्षेशी संबंधित नियमांचे, तसेच आरोग्य व इमारत विषयक नियमांचे परिपूर्ण पालन केले जाऊन उपहारगृहे ही अधिकाधिक सुरक्षित व अधिक चांगल्या दर्जाची व्हावीत, या उद्देशाने महापालिकेचा सातत्याने प्रयत्न सुरु असतो. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी सायंकाळी 'आहार', 'नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया' आणि 'हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया' या संघटनांची विशेष बैठक महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.


नियमित तपासणी करण्यासाठी स्वतंत्र संघटना

या बैठकीदरम्यान संघटनांच्या प्रतिनिधींशी हॉटेलच्या संबंधित विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. यामध्ये अग्निसुरक्षा, आरोग्य व इमारतीच्या अनुषंगाने असणाऱ्या संबंधित नियमांच्या पालनाबाबत संघटनेच्या स्तरावर देखील एक यंत्रणा विकसित करावी आणि या यंत्रणेमार्फत अग्निसुरक्षा विषयक प्रतिबंधात्मक तपासणी नियमितपणे करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

याबरोबरच संघटनेचे जे सदस्य हे नियम पाळणार नाहीत, त्यांना सदस्यत्व देऊ नये किंवा जे सदस्य असतील, त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी सूचना महापालिका आयुक्तांनी केली. यावेळी हॉटेलच्या तिन्ही संघटनांनी या सूचनेनुसार आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्तांना दिले.



हेही वाचा

कमला मिलचा चौकशी अहवाल शुक्रवारी सादर होणार


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा