पालिका आयुक्तांची गाडी ट्रॅफिकमध्ये अडकल्याने सुरक्षारक्षक निलंबित

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची गाडी ट्रॅफिकमध्ये अडकल्याने महापालिकेच्या चार सुरक्षा रक्षकांना तडकफडकी निलंबित करण्यात आलं. महापालिका मुख्यलयातील ट्रॅफिक न काढल्यामुळे या चार सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

SHARE

आयुक्तांनी घेतली दखल

महापालिका आयुक्तांची गाडी महापालिका मुख्यालयातील प्रवेश क्रमांक २ वरून निघून टाइम्स ऑफ इंडियाच्या शेजारील गल्लीतून प्रवेश क्रमांक ४ आणि ५ येथून जात असतानाच ट्रॅफिकमध्ये अडकली. ही घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी प्रवेश क्रमांक ४ वरील तैनात सुरक्षा रक्षकांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. त्यानुसार त्या प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांची निलंबन ऑर्डर बुधवारी महापालिकेच्या सुरक्षा विभागाने जारी केली आहे.

सुरक्षा विभागाने केली कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, आयुक्तांना म्युनिसिपल बँकेच्या सर्वसाधारण मिटिंगला जायचं होतं. त्यावेळी आयुक्तांची गाडी जेव्हा प्रवेश क्रमांक ४ आणि ५ जवळ आली तेव्हा, तिथे एक दुसरी गाडी उभी होती, त्या गाडीला बाजूला होईपर्यंत विलंब झाला होता. आयुक्तांना अशाप्रकारचा अनुभव यापूर्वीही आला होता. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी सुरक्षा विभागाला कडक कारवाईचे निर्देश दिले होते. 

त्यानुसार कारवाई करण्यासाठी सीसीटीव्हीची तपासणी केली असता १३ मिनिटांपर्यंत प्रवेशद्वारवार एकही सुरक्षा अधिकारी उपस्थित नव्हाता. सर्व बाब उघडकीस आल्यावर त्या चारही सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा -

जोगेश्वरी भूखंडप्रकरणी पालिका पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

संबंधित विषय
ताज्या बातम्या