Advertisement

विकासकामांचा कृती आराखडा द्या - महापालिका आयुक्त


विकासकामांचा कृती आराखडा द्या - महापालिका आयुक्त
SHARES

मुंबई - नव्या आर्थिक वर्षापासून विकास कामांच्या अनुषंगाने कशाप्रकारे कार्यवाही करता येईल याची माहिती आणि नियोजन आराखडा सादर करण्याचे आदेश सर्व 24 प्रशासकीय विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना दिले होते. त्यानुसार सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपल्या परिमंडळीय उपायुक्तांच्या मार्गदर्शनानुसार संगणकीय सादरीकरण केले असून या सर्व कामांच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिले आहेत.

महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका अधिकाऱ्यांची मासिक आढावा बैठक शनिवारी महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या सभागृहात पार पडली. या बैठकीला अतिरिक्त आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. या वेळी सहाय्यक आयुक्तांनी सादरीकरण करताना वर्षभरात सुशोभित होणारी वाहतूक बेटे, रस्ते दुभाजक, नव्या आर्थिक वर्षात करण्यात येणारी स्मशानभूमींची सुधारणा, दवाखाने-प्रसुतिगृहे-महापालिकेच्या जुन्या इमारती इत्यादींची सुधारणा आणि दुरुस्ती, तलाव परिसर आणि महत्त्वाच्या परिसरांचे सुधारणा, नाल्याचे रुंदीकरण याबाबत कार्यवाही आराखडा तसेच ज्या परिसरांमध्ये मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे नाही, अशा परिसरांमध्ये मलनिस्सारण वाहिन्या टाकणे आणि तयार करणे याबाबतची माहिती आणि नियोजन आराखडा सहाय्यक आयुक्तांनी आयुक्तांना सादर केला. सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त यांनी मांडलेल्या कामांच्या अंमलबजावणीचा कालबद्ध कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी या बैठकीत दिले.

महापालिका शाळांमधील पाण्याच्या टाक्या साफ करा

महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये असणाऱ्या पाणी साठवण टाक्यांची गुणवत्तापूर्ण साफसफाई उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत करून घ्यावी, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहे. तसेच या पाणी साठवण टाक्यांतील पाण्याची आरोग्याच्या दृष्टीकोनातून नियमितपणे तपासणी करून घ्यावी, असेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट

मुंबई महालिकेच्या सर्व सार्वजिनक शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑडीट हे तातडीने करण्याचे आदेश महापालिका आयुक्त यांनी तातडीने करण्याचे आदेश सर्व संबंधित सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले. तसेच आपल्या भागामध्ये नव्याने बांधण्यात येणारी सार्वजनिक शौचालये, तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरुस्तीही तातडीने करण्याचे आदेश त्यांनी दिले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा