Advertisement

खासगी आवारातील झाडांची जबाबदारी महापालिकेने झटकली

रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांबरोबरच रस्त्यांवर येत असलेली खासगी जागेवरील झाडे कापण्याऐवजी आयुक्तांनी अशाप्रकारचे निर्देश देत त्यांना लोकांच्या जीवाची पर्वा नसल्याचं दाखवून दिलं आहे. केवळ फलक लावून ''तुमची काळजी तुम्हीच घ्या'' असं म्हणत महापालिका आयुक्त आपली जबाबदारी नागरिकांच्या अंगावर ढकलत असल्याचा आरोप होत आहे.

खासगी आवारातील झाडांची जबाबदारी महापालिकेने झटकली
SHARES

काही दिवसांपूर्वीच दादरच्या नायगाव येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मार्गावर खासगी आवारातील झाड कोसळून एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर खासगी आवारातील झाडेही महापालिकेने विनाशुल्क तोडावी, अशी मागणी होत असताना महापालिका आयुक्तांनी या झाडांवर ‘धोकादायक झाड’ म्हणून फलक लावण्याच्या सूचना केल्या आहेत.


जबाबदारी कुणाची?

रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांबरोबरच रस्त्यांवर येत असलेली खासगी जागेवरील झाडे कापण्याऐवजी आयुक्तांनी अशाप्रकारचे निर्देश देत त्यांना लोकांच्या जीवाची पर्वा नसल्याचं दाखवून दिलं आहे. केवळ फलक लावून ''तुमची काळजी तुम्हीच घ्या'' असं म्हणत महापालिका आयुक्त आपली जबाबदारी नागरिकांच्या अंगावर ढकलत असल्याचा आरोप होत आहे.


झाडांची पुन्हा पाहणी

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची पावसाळापूर्व पाहणी यापूर्वीच करण्यात आलेली आहे. तसंच या पाहणीदरम्यान धोकादायक स्थितीत आढळून आलेल्या झाडांबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. तरीही येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांची पुनर्पाहणी करण्यात यावी, असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शनिवारी झालेल्या मासिक आढावा बैठकीत दिले.


काय लिहिणार?

या झाडांची पाहणी करत असतानाच खाजगी आवारातील जी झाडे रस्त्यांच्या बाजूने धोकादायक पद्धतीने झुकलेली आहेत, अशा झाडांबाबत देखील प्रतिबंधात्मक माहिती असलेले इशारा फलक बसविण्याचे आदेशही आयुक्तांनी या बैठकीदरम्यान दिले आहेत. या फलकांवर ''झाड धोकादायक स्थितीत असून त्याखील कोणीही थांबू नये'', अशा आशयाचा मजकूर लिहावा, असं सांगितलं आहे.


सोसायट्यांना आवाहन

खाजगी, शासकीय तसंच निमशासकीय परिसरातील झाडांची निगा घेण्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. पावसाळ्याच्या काळात झाडे पडून वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन याबाबत सर्व संबंधितांनी महापालिकेच्या पूर्व परवानगीने आपल्या परिसरातील अवास्तव वाढलेल्या झाडांच्या फांद्या सुयोग्य पद्धतीने पावसाळ्यापूर्वीच छाटाव्यात, असं आवाहन महापालिकेद्वारे यापूर्वीच करण्यात आले आहे. यादृष्टीने आवश्यक ती पाहणी मोहीम उद्यान खात्यातील अधिकारी व कर्मचा-यांनी हाती घ्यावी व ती पुढील १५ दिवसांत पूर्ण करावी, असे निर्देश दिले आहेत.


  • वृक्ष गणनेनुसार मुंबईतील एकूण झाडे : २९ लाख ७५ हजार २८३
  • खासगी आवारातील झाडे : १५ लाख ६३ हजार ७०१
  • शासकीय परिसरातील झाडे : ११ लाख २५ हजार १८२
  • रस्त्यांच्या कडेला असणारी झाडे : १ लाख ८५ हजार ३३३
  • उद्यानांमधील झाडांची संख्या :१ लाख १ हजार ६७



हेही वाचा-

मुंबईतील पावणे दोन लाख झाडांपासून सांभाळा

आयुक्तांच्या वृक्षतोडीच्या विशेषाधिकारांना चाप



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा