Advertisement

मुंबईतील पावणे दोन लाख झाडांपासून सांभाळा


मुंबईतील पावणे दोन लाख झाडांपासून सांभाळा
SHARES

पावसाळा तोंडावर आल्याने मान्सूनपूर्व झाडांच्या फांद्यांची छाटणीचं काम महापालिकेने हाती घेतलं आहे. अशातच मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय मार्गावरील झाड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना या झाडांपासून नक्कीच सांभाळून राहावं लागणार आहे.


रस्त्यांच्या कडेला 1.45 लाख झाडं

मुंबईतील रस्त्यांच्या कडेला तब्बल पावणे दोन लाख झाडे आहेत. महापालिकेने फांद्यांची छाटणी केल्यांनतरही पावसाळ्यात वादळीवाऱ्यासह अनेक झाडे उन्मळून पडण्याचे किंवा त्यांच्या फांद्या तुटून पडण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे मुंबईकरांचे जीव जात असतात. 


उद्यान खात्याची विशेष बैठक

अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान खात्याची विशेष बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत सिंघल यांनी उद्यान विभागाला पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महापालिकेची पूर्व परवानगी घेऊन झाडांची छाटणी पावसाळ्यापूर्वीच करण्याचे आवाहन महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे करण्यात आलं आहे.

मुंबईत इतकी झाडं

वृक्ष गणनेनुसार संपूर्ण मुंबईत एकूण २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. यापैकी १५ लाख ६३ हजार ७०१ एवढी झाडं खासगी आवारांमध्ये आहेत. तर ११ लाख २५ हजार १८२ झाडं शासकीय परिसरांमध्ये आहेत. याव्यतिरिक्त १ लाख ८५ हजार ३३३ झाडं ही रस्त्यांच्या कडेला असून उर्वरित १ लाख १ हजार ६७ एवढी झाडं विविध उद्यानांमध्ये आहेत.


ही जबाबदारी कुणाची?

मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या झाडांची तसेच वृक्षांची निगा महापालिकेद्वारे नियमितपणे राखली जात असते. मात्र, सोसायटी, शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागा इत्यादींमध्ये असणाऱ्या झाडांची काळजी घेण्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते.

मृत झालेल्या किंवा किडीचा प्रादुर्भाव असलेल्या झाडांबाबत देखील महापालिकेच्या विभाग कार्यालयातील वृक्ष अधिकाऱ्यांशी (ट्री ऑफीसर) यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कार्यवाही पावसाळ्यापूर्वी करवून घ्यावी, असेही आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा