Advertisement

खासगी जागेतील झाडे कापा, लोकांचा जीव वाचवा! नगरसेवकांची मागणी

गुरुवारी संध्याकाळी दादरमधील मुंबई मराठी ग्रंथसंग्राहलय मार्गावरील इमारतीच्या कुंपणातील झाड कोसळून दिनेश सनगले (३८) नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या दुघर्टनेप्रकरणी महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून, महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा हा बळी असल्याचा आरोप केला. मृत व्यक्तीच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची मागणी देखील त्यांनी केली.

खासगी जागेतील झाडे कापा, लोकांचा जीव वाचवा! नगरसेवकांची मागणी
SHARES

दादर-नायगावमधील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय इमारतीच्या कुंपणातील झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे शनिवारी महापालिका सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. झाडे किंवा फांद्या अंगावर पडून होणाऱ्या मृत्यूवरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलं. झाडे कापण्याच्या धोरणात बदल करण्याची मागणी करताना खासगी जागेवरील झाडे देखील नि: शुल्क दरात कापण्यात यावीत, अशी मागणी देखील सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे. सोबतच दादरमधील झाड दुघर्टनेत बळी गेलेल्या मृताच्या कुटुंबातील व्यक्तीला महापालिका सेवेत सामावून घेण्याची मागणीही सभागृहतील सदस्यांनी केली.


काय आहे प्रकरण?

गुरुवारी संध्याकाळी दादरमधील मुंबई मराठी ग्रंथसंग्राहलय मार्गावरील इमारतीच्या कुंपणातील झाड कोसळून दिनेश सनगले (३८) नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या दुघर्टनेप्रकरणी महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून, महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा हा बळी असल्याचा आरोप केला. मृत व्यक्तीच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची मागणी देखील त्यांनी केली.


झाड कापण्यासाठी अर्ज

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने ऑगस्ट महिन्यात हे झाड कापण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर कोणताही निर्णय न घेणाऱ्या एफ-दक्षिण विभागातील उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी ७ दिवसांपूर्वी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाला पत्र पाठवून या झाडांची छाटणी आपण करावी, असं कळवलं आणि त्यानंतर ही घटना घडली.


महापालिका सेवेत सामावून घ्या

शिक्षण समितीचे अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी झाडे कापण्याच्या धोरणात बदल करण्याची सूचना करत मृत कुटुबांच्या नातेवाईकाला महापालिका सेवेत सामावून घेण्याची मागणी केली. यावेळी सर्व नगरसेवकांनी धोकादायक झाडांचा सर्व्हे करण्याचीही मागणी केली. झाड पडून दुघर्टना घडल्यास त्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं, अशीही सूचनाही सदस्यांनी मांडली.


गुन्हा दाखल करा

भाजपाच्या स्वप्ना म्हात्रे यांनी होर्डींग लावण्यासाठी झाडाला इंजेक्शन देऊन मारल्याचा आरोप केला, तर भाजपाच्या हेतल गाला यांनी ५०० आणि ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात सवलत दिली जात असेल, तर खासगी सोसायटीतील झाडे नि:शुल्क का कापली जात नाही? असा प्रश्न केला. शिवसेनेचे बाळा नर यांनी याप्रकरणी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.


दु:खद परिस्थिती

चेंबूर घटनेतील घोडस्वार या महिलेचा अशाचप्रकारे मृत्यू झाल्याने त्यांच्या १८ वर्षांच्या मुलाला आजीसह आपल्या भावंडांचं पालनपोषण करण्यासाठी नोकरीनिमित्त घराबाहेर पडावं लागलं आहे, याला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारत शिवसेनेच्या समृद्धी काते यांनी मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला नोकरी देण्याची मागणी केली.

झाडे कापण्यासाठी बेस्टकडून गाड्या घेण्याऐवजी महापालिकेने स्वत:च्या गाड्या खरेदी कराव्यात. ७ परिमंडळांमध्ये प्रत्येकी १ याप्रमाणे स्नॉर्केल खरेदी करण्यात यावी, अशी मागणी सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी केली.



हेही वाचा-

मुंबई, तुला झाडांवर भरवसा नाय काय? वर्षाला 31 कोटी खर्च, तरीही पडझड!

पोलिसांची माणुसकी, दुर्घटनेत मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबाला केली मदत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा