गतिमान कारभारासाठी फायलींची भ्रमंती थांबणार

 Pali Hill
गतिमान कारभारासाठी फायलींची भ्रमंती थांबणार

मुंबई - एखाद्या प्रस्तावास त्वरेनं मंजुरी देण्यासाठी महापालिकेला अखेर उपाय सापडलाय. त्यानुसार मंजुरी कामात अडथळा ठरणाऱ्या फायली थेट कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे पाठवण्याचा निर्णय प्रशासानानं घेतलाय. त्यामुळे कधी नव्हे ते रखडणारे प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होईल.

महापालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे अनेकदा हजारो फायली गहाळ झाल्याचे प्रकार घडलेत. ही बाब लक्षात घेवून, महापालिकेचा कारभार अधिक गतिमान होण्यासाठी तसंच मंजूर झालेल्या फायली थेट कारवाई करणाऱ्यासाठी संबंधित खातेप्रमुखाकडे किंवा विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे पाठवण्याचे आदेश पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिलेत. या आदेशामुळे मंजूर झालेल्या फायलींची टेबल भ्रमंती थांबण्यास मदत होणार असल्याचा दावा, पालिका प्रशासनानं केलाय.

नामंजूर फाइलची भ्रमंती मात्र कायम

महापालिका सभांमध्ये नामंजूर होणाऱ्या फायलींची भ्रमंती मात्र कायमच राहणार आहे. जे प्रशासकीय प्रस्ताव नामंजूर होतील ते नामंजूर होण्यामागची कारणमीमांसा संबंधित अधिकाऱ्यांना कळावी, यादृष्टीने नामंजूर झालेली फाइल पूर्वीच्याच पद्धतीनं सर्व संबंधित अधिकाऱ्यांमार्फत खातेप्रमुख / विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे पाठवली जाईल.

Loading Comments