Advertisement

लसीकरण केद्रांवरील राजकीय बॅनर्स काढण्याचे मुंबई मनपा आयुक्तांचे आदेश

लसीकरण केंद्रांवर लावले गेलेले राजकीय बॅनर्स आणि होर्डिंग्ज काढण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.

लसीकरण केद्रांवरील राजकीय बॅनर्स काढण्याचे मुंबई मनपा आयुक्तांचे आदेश
SHARES

लसीकरण केंद्रांवर लावले गेलेले राजकीय बॅनर्स आणि होर्डिंग्ज काढण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. महापालिकेकडे लोकप्रतिनिधींकडून करण्यात येणाऱ्या जाहिरातबाजीबाबत अनेक तक्रारी येत असल्यामुळे महापालिका आयुक्तांनी जाहिरातबाजी रोखण्याची तंबी दिली आहे.

जर नगरसेवक, आमदार, खासदार किंवा अन्य कुणाकडून लसीकरण केंद्रांवर लावण्यात आलेल्या जाहिराती, बॅनर्स किंवा होर्डिंग्ज विनंती करूनही उतरवले जात नसतील, तर ते काढले जावेत, असे मनपा आयुक्तांनी आदेशात म्हटलं आहे. तसंच, मुंबई मनपाकडे अशा बॅनर्स आणि होर्डिंग्ज संदर्भात अनेक तक्रारी येत असल्याचं मनपा आयुक्तांनी सांगितलं आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम त्यातील प्रचाराचा भाग होऊ लागला आहे. महानगरपालिकेनं मुंबईत अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. या लसीकरण केंद्रांच्या बाहेर लसीकरण सुरू आहे की नाही या फलकापेक्षाही आधी एखाद्या राजकीय पक्षाचा किंवा नेत्याचा फलक नजरेस पडतो.



हेही वाचा

मुंबई महापालिकेची जागतिक निविदा रद्द, एकही कंपनी पात्र नाही

म्युकरमायकोसिसवरील उपचाराचे दर निश्चित

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा