Advertisement

मुंबई महापालिकेची जागतिक निविदा रद्द, एकही कंपनी पात्र नाही

कोरोना प्रतिबंधक लसीचा मोठा तुटवडा भासत असल्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे लस खरेदी करण्यासाठी पालिकेने जागतिक निविदा काढली होती.

मुंबई महापालिकेची जागतिक निविदा रद्द, एकही कंपनी पात्र नाही
SHARES

कोरोना लस (corona vaccine) खरेदी करण्यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) जागतिक निविदा (global tender) काढली होती.  मात्र, ही निविदा आता रद्द करण्यात आली आहे.  याचं कारण म्हणजे या निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या ९ कंपन्यांपैकी एकही कंपनी पात्र ठरली नाही. 

निविदा रद्द केल्याने पालिकेच्या लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. दरम्यान, मुंबई महापालिका (bmc) नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करू शकते, अशी माहिती समोर आली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा मोठा तुटवडा भासत असल्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे लस खरेदी करण्यासाठी पालिकेने जागतिक निविदा काढली होती.  या निविदाद्वारे १ कोटी डोसची मागणी करण्यात आली होती. 

या निविदेतून एका पुरवठादाराने माघार घेतली होती. त्यामुळे नऊ कंपन्या या निविदा प्रक्रियेत होत्या. मात्र, लसींचा पुरवठा करण्यासाठीच्या अटी आणि शर्तीमध्ये या कंपन्या पात्र ठरल्या नाहीत. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. याशिवाय एकाही लस उत्पादक कंपनीने या निविदा प्रक्रियेत भाग घेतला नव्हता. त्यामुळेही महापालिकेला लस पुरवठ्याच्या अटी आणि शर्ती पूर्ण करणारी कंपनी मिळू शकली नाही. 

फायझर अस्ट्रॅझेनेकाची लस पुरवणाऱ्या कंपनीनेही या निविदेत भाग घेतला होता. मात्र, नंतर या कंपनीने माघार घेतली. कोरोनाची तिसरी लाट येण्यासाठी प्रत्येक मुंबईकरांना ऑगस्ट अखेरपर्यंत लस देण्याचं पालिकेचं उद्दिष्ट आहे. मात्र, आता निविदाच रद्द झाल्याने पालिकेला केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या लसीवर अवलंबून रहावं लागणार आहे.

 


हेही वाचा - 

  1. म्युकरमायकोसिसवरील उपचाराचे दर निश्चित

मुंबईतील 'या' कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘झिंगाट’ डान्स!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा