Advertisement

रविवारीही कारवाईचा धडाका, शहरभरातील बेकायदा बांधकामांवर महापालिकेचा हातोडा


रविवारीही कारवाईचा धडाका, शहरभरातील बेकायदा बांधकामांवर महापालिकेचा हातोडा
SHARES

कमला मिल कंपाऊंडमधील वन अबोव्ह आणि मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर जाग आलेल्या मुंबई महापालिकेने शहरभरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. शनिवारी ३०० हून अधिक हाॅटेल, रेस्टाॅरंट आणि पबचे बेकायदा बांधकाम तोडल्यानंतर महापालिकेने रविवारी सुट्टीच्या दिवशीही अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्याचं काम सुरू ठेवलं आहे. यामुळे ३१ डिसेंबरला कमाई करण्याच्या तयारीत असलेल्या रेस्टाॅरंट, पब मालकांच्या आशेवर पाणी फेरलं आहे.



सुट्टीच्या दिवशीही कारवाई

रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वाॅर्डातील अतिक्रमणविरोधी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बेकायदा बांधकामाविरोधातील कारवाईला सकाळपासूनच सुरूवात केली. शनिवारी कमला मिलमधील राहिलेलं बेकायदा बांधकाम हटवण्यात आलं.



हातोडा कुठे पडला?

त्याशिवाय महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गोवंडीतील विकास बारमधील बेकायदा सामान जप्त केलं. एम/पूर्व भागातील खाना खजाना हाॅटेलच्या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यात आली. येथील १५ सिलिंडरही जप्त करण्यात आले. पी/ दक्षिण विभागातील लकी हाॅटेलच्या खुल्या जागेवर उभारण्यात आलेल्या किचनवर कारवाई करण्यात आली. 




तर के/पूर्व विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली अंधेरी पूर्वेकडील एम्पेरीअल हाॅटेलच्या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यात आली. सोबतच अंधेरी पश्चिमेकडील सरदार वल्लभभाई नगर येथील बाॅम्बे ठेका हाॅटेलवरही कारवाई करण्यात आली.



एल वाॅर्डातील हाॅटेल हाॅलिडे इन ने उभारलेल्या बेकायदा बांधकामाप्रकरणी त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. अग्निशमन सुरक्षा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी स्पाईस रेस्टाॅरंटला सील ठोकण्यात आलं. तर वांद्र्यातील एमआयजी क्लबसमोरील अमेया हाॅटेल आणि मालाडमधील मंत्रा हाॅटेलवर कारवाई करण्यात आली.



हेही वाचा-

एकाच दिवशी ३१४ अनधिकृत पब, रेस्टॉरंट बारवर कारवाई; ७ हॉटेल केले सील

थर्टी फर्स्ट घरातच साजरा करा! पब, रेस्टॉरंट-बारमधील पार्टीवर पाणी?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा