Advertisement

जे. एन. उद्यानातील अपंग महासंघाच्या कार्यालयावर हातोडा

नरिमन पॉईँट येथील जवाहरलाल नेहरू अर्थात जे. एन. गार्डनच्या जागेमध्ये बरीच व्यावसायिक बांधकामे करण्यात आली होती. त्यामुळे हे मनोरंजन उद्यान वाचवण्यासाठी नरिमन पॉईँट रेसिडेंन्स असोसिएशनने तक्रार केली होती.

जे. एन. उद्यानातील अपंग महासंघाच्या कार्यालयावर हातोडा
SHARES

नरिमन पॉईंटमधील जवाहर नेहरु उद्यानाच्या जागेत झालेल्या शेवटच्या अतिक्रमणावर अखेर महापालिकेने सोमवारी हातोडा चालवला. येथील महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी महासंघाचं कार्यालय तोडून टाकण्यात आलं. असं असलं, तरी उद्यानातील भाजपा आणि जनता दलाची कार्यालये कायम राहणार आहेत. ही दोन्ही कार्यालये १९९१पूर्वीची असल्याने या कार्यालयावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.


रहिवाशांची तक्रार

नरिमन पॉईँट येथील जवाहरलाल नेहरू अर्थात जे. एन. गार्डनच्या जागेमध्ये बरीच व्यावसायिक बांधकामे करण्यात आली होती. त्यामुळे हे मनोरंजन उद्यान वाचवण्यासाठी नरिमन पॉईँट रेसिडेंन्स असोसिएशनने तक्रार केली होती.


कुणावर कारवाई?

त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार येथील एमटीडीसी, एम्प्लॉयमेंट एक्चेंजसह काही कार्यालयांवर कारवाई करून ती सर्व बांधकामे तोडून टाकली होती. परंतु महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी महासंघ, भाजपा आणि जनता दल यांची पक्ष कार्यालय एवढी याठिकाणी होती.


ताबा कुणाकडे?

मात्र, यापैकी भाजपा आणि जनता दल यांची पक्ष कार्यालये ही १९९१ च्या पूर्वीची असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. परंतु महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी महासंघाचे कार्यालय हे त्यानंतरचं असल्याने ते कार्यालय सोमवारी महापालिका ए विभागाच्या माध्यमातून तोडण्यात आलं आहे. या जागेचा ताबा हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे, त्यांच्या विनंतीनुसार महापालिकेने ते तोडल्याचं ए विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा-

प्लास्टिकबंदी इफेक्ट! महापालिकेकडे १२० टन प्लास्टिक जमा

मुंबईकरांना पुन्हा एकदा तुंबईला सामोरे जावं लागेल- सचिन अहिर


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा