Advertisement

ब्रिचकँडीसमोरील प्रेमसन्स स्टोअर्सवर हातोडा!

भुलाभाई देसाई मार्गावर असलेल्या या डिपार्टमेंटल स्टोअरच्या गच्चीवर ५ अनधिकृत शेड्स उभारण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या डी विभागाला मिळाली होती. त्यानुसार तापसणी करत महापालिकेनं प्रेमसन्स डिपार्टमेन्टल स्टोअर्सला हे अनधिकृत बांधकाम हटवण्यासंबंधी नोटीस पाठवली. तरीही प्रेमसन्सनं या नोटीसकडं कानाडोळा केला. त्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने ही धडक कारवाई केली.

ब्रिचकँडीसमोरील प्रेमसन्स स्टोअर्सवर हातोडा!
SHARES

ब्रिचकँडी रूग्णालय आणि जुन्या अमेरिकन दूतावासाजवळील प्रसिद्ध प्रेमसन्स डिपार्टमेंटल स्टोअर्सला अखेर मुंबई महापालिकेनं दणका दिला आहे. डिपार्टमेंटल स्टोअरच्या गच्चीवरील ५ अनधिकृत शेडसवर महापालिकेनं गुरूवारी हातोडा चालवला. या स्टोअरचा धोकादायक आणि अवाढव्य नामफलकदेखील महापालिकेने हटवल्याची माहिती डी विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली.

नोटीसकडे कानाडोळा

भुलाभाई देसाई मार्गावर असलेल्या या डिपार्टमेंटल स्टोअरच्या गच्चीवर ५ अनधिकृत शेड्स उभारण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या डी विभागाला मिळाली होती. त्यानुसार तापसणी करत महापालिकेनं प्रेमसन्स डिपार्टमेन्टल स्टोअर्सला हे अनधिकृत बांधकाम हटवण्यासंबंधी नोटीस पाठवली. तरीही प्रेमसन्सनं या नोटीसकडं कानाडोळा केला. त्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने ही धडक कारवाई केली.

बांधकाम जमीनदोस्त

प्रेमसन्सच्या गच्चीवरील सुमारे २ हजार चौरस फूट परिसरात अनधिकृतपणे ५ शेड्स बांधण्यात आल्या होत्या. या शेड्चा वापर सामान ठेवण्यासाठी आणि दुकानातील कामगारांच्या राहण्यासाठी केला जात होता. महापालिकेच्या २६ कर्मचाऱ्यांच्या पथकानं गुरूवारी सकाळपासून अनधिकृत बांधकाम तोडण्याचा कामाला सुरूवात करत दुपारपर्यंत सर्व अनधिकृत बांधकाम हटवलं.

खर्चही वसूल करणार

अनधिकृत बांधकाम हटवण्याबरोबरच महापालिकेनं प्रेमसन्सला आणखी एक दणका दिला आहे. तो म्हणजे अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कामासाठी जो काही खर्च पालिकेला आला तो खर्च पालिका प्रेमसन्सच्या मालमत्ता करातून वसूल करणार आहे.

हेही वाचा-

लिओपोल्ड कॅफेवर महापालिकेचा हातोडा!

डिजिटल होर्डिंगला पालिका देणार प्रोत्साहन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा