Advertisement

मिठी नदीच्या कामाला आणखी वेग

पावसाळ्यात मुंबईची होणारी तुंबई रोखण्यासाठी व मुंबईतल्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेगानं कामं केली जात आहेत.

मिठी नदीच्या कामाला आणखी वेग
SHARES

पावसाळ्यात मुंबईची होणारी तुंबई रोखण्यासाठी व मुंबईतल्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेगानं कामं केली जात आहेत. मिठी नदीच्या कामाला देखील वेग आल्याची माहिती समोर येत आहे. आजमितीस रुंदीकरण आणि खोलीकरणाचं काम ९५ टक्के आणि मिठी नदीची संरक्षक भिंत बांधण्याचं काम ८० टक्के पूर्ण झालं आहे. त्यामुळं मिठी नदीच्या धारण क्षमतेमध्ये दुपट्टीनं आणि वहनक्षमतेमध्ये ३ पटीनं वाढ झाली आहे.

मिठी नदीच्या विकासाचा आणि प्रदूषण नियंत्रणाचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्याची ४ पॅकेजमध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे.

पहिला टप्पा : पवई येथील फिल्टर पाड्यापासून बांधकाम करणं, मलनिस्सारण वाहिनी टाकणं, सर्व्हिस रोड बांधकाम, ८ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मलजल प्रक्रियेचं बांधकाम अशा १३३ कोटींच्या कामांचा समावेश आहे.

दुसरा टप्पा : संरक्षक भिंत, सेवा रस्ता, पवईसह कुर्ला इथं मलनिस्सारण वाहिनी टाकणं इतक्या ५७० कोटींच्या कामाचं कार्यादेश देण्यात आलं आहेत.

तिसरा टप्पा : संरक्षक भिंत, सेवा रस्ता, मलनिस्सारण वाहिनी, पूल अशा कामांसाठी एक हजार ८७५ कोटी आहेत. चारमध्ये बापट नाल्यापासून सफेद पूल नाला ते घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्रापर्यंत बोगद्याचे काम अंतर्भूत असून, या कामाचा खर्च २७० कोटी असून, अर्थसंकल्पात ३४७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

दहिसर, पोयसर, ओशिवरा या नद्यांच्या कामांसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. मिठी नदीच्या कामासह इथं पर्यटन आणि कृत्रिम तलावाचं काम करण्यात येणार आहे. याकरिता सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असून, ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. छोटे नाले, मोठे नाले आणि मिठी नदीमधून गाळ काढण्यासाठी अनुक्रमे ६२, ८० आणि ५७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पर्जन्य जलवाहिन्यांच्या विविध कामांकरिता एक हजार १४९.७४ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे.



हेही वाचा -

महापालिकेकडून बेस्टला केवळ ७५० कोटींचे अनुदान

पुढील महिनाभरात सर्व टोल नाक्यांवर १०० टक्के फास्टॅगची अंमलबजावणी


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा