Advertisement

प्रभाग पुनर्रचनेमुळे नगरसेवकांमध्ये धाकधूक


प्रभाग पुनर्रचनेमुळे नगरसेवकांमध्ये धाकधूक
SHARES

मुंबई  - मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2017मध्ये होणार आहे. त्यासाठी प्रभाग पुनर्रचनेची सोडत येत्या 3 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे वॉर्ड पुनर्रचनेत सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये धाकधूक वाढली आहे. शहरातील सात प्रभाग कमी होऊन, उपनगरात वाढणार असल्याची माहिती पालिकेतील सुत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रारूप प्रभाग रचनेचा फटका शहरातील प्रभागांना बसण्याची शक्यता आहे. 
मुंबईत सध्या २२७ नगरसेवक असून त्यातील शहर विभागात 63 नगरसेवक आहेत. मात्र, कुलाब्यापासून नव्याने प्रभागांची रचना होणार आहे. त्यामुळे शहर विभागातील सात प्रभाग होणार आहेत. त्याचा फटका कुलाबा, नरिमन पॉईंट, मदनपुरा, गिरगाव, चंदनवाडी, ग्रँटरोड, भायखळा या सर्व विभागांना बसणार आहे. प्रभादेवी, वरळी, लोअर परळमधील दोन प्रभाग कमी होणार असल्याचे निवडणूक विभागातील अधिका-यांकडून समजते. पश्चिम उपनगरातील कांदिवली, मालाड तसेच गोवंडी, देवनार या भागांमध्ये प्रत्येकी दोन-दोन वॉर्ड वाढण्याची शक्यता आहे. शहरातील प्रभाग कमी होत असले तरी कुर्ला, भांडूप, गोरेगाव, दहिसर या भागात एकेक वॉर्ड वाढवले जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. घाटकोपरमधील एक जागा कमी होऊन ती जागा कुर्ल्यात वाढ होणार आहे. तर चेंबूर, टिळकमधील एक जागा कमी होऊन गोवंडी, देवनार, मानखुर्दमधील दोन जागा वाढणार असल्याचेही समजते. पश्चिम उपनगरात केवळ वांद्रे ते सांताक्रूझ पूर्व भागातील एक प्रभाग कमी होत आहे तर चार प्रशासकीय विभाग कार्यालयांमधील नगरसेवकांची सदस्यसंख्येत कोणताही बदल होणार नाही. मात्र मालाड, कांदिवली या दोन प्रशासकीय प्रभागांत प्रत्यकी दोन  तर गोरेगाव आणि दहिसर या प्रशासकीय प्रभागात प्रत्येकी एकप्रमाणे नगरसेवकांची प्रभागसंख्या वाढवली जाणार आहे. त्यामुळे प्रभाग पुनर्रचनेचा फटका कोणत्या नगरसेवकांना बसतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा