Advertisement

पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये बोनस; अवघ्या ५०० रुपयांच्या वाढीने कर्मचारी नाराज

महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, परिचारीका, शिक्षक, तंत्रज्ञ, अभियंते, कंत्राटी कामगार अादींना बोनस देण्यालाठी १५६.७ कोटी रुपयांची तरतूद २०१७-१८ साठी करण्यात आली आहे. त्यानुसार ४० हजार रुपये वा एकूण वेतनाच्या २० टक्के इतका बोनस देण्याची मागणी समन्वय समितीची होती.

पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये बोनस; अवघ्या ५०० रुपयांच्या वाढीने कर्मचारी नाराज
SHARES

मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेत त्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळं आता पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

पण प्रत्यक्षात पालिका कर्मचाऱ्यांनी मात्र यावर नाराजी दर्शवली आहे. ४०  हजार रुपये बोनसची मागणी केली असताना गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ५०० रुपयांचीच वाढ देत कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याची प्रतिक्रिया मुंबई महापालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने मुंबई लाइव्हशी बोलताना दिली आहे.


१५६.७ कोटींची तरतूद

महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, परिचारीका, शिक्षक, तंत्रज्ञ, अभियंते, कंत्राटी कामगार अादींना  बोनस देण्यालाठी १५६.७ कोटी रुपयांची तरतूद २०१७-१८ साठी करण्यात आली आहे. त्यानुसार ४० हजार रुपये वा एकूण वेतनाच्या २० टक्के इतका बोनस देण्याची मागणी समन्वय समितीची होती. या मागणीसाठी पालिका कर्मचाऱ्यांनी समन्वय समितीच्या माध्यमातून गुरूवारी आझाद मैदानावर आंदोलनही केलं होतं.


समन्वय समितीची नाराजी

 सोमवारी गटनेत्यांच्या बैठकीत १५ हजार रुपये बोनस देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी १४ हजार ५०० रुपये इतका बोनस मिळाला होता. आता त्यात केवळ ५०० रुपयांची वाढ करून बोनस जाहीर करण्यात आल्यानं तसंच कर्मचाऱ्यांच्या मागणीचा कोणताही विचार न करता बोनस जाहीर करण्यात आल्याचं म्हणत समन्वय समितीनं नाराजी व्यक्त केली. कमीत कमी २२ हजार रुपये तरी बोनस सहज मिळाला असता असं म्हणत आपली नाराजी महापौरांपर्यंत पोहचवण्यात आल्याचंही समन्वय समितीनं सांगितलं अाहे.



हेही वाचा - 

सरकारी घर लाटणाऱ्या बाबूंना न्यायालयाचा दणका, एकापेक्षा अधिक घरं देण्याचा अधिकार कुणालाच नाही

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाला वेग, आतापर्यंत ४९ प्रस्तावांना मंजुरी




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा