Advertisement

टी वॉर्डमध्ये ध्वजारोहण सोहळा


टी वॉर्डमध्ये ध्वजारोहण सोहळा
SHARES

मुलुंड - मुलुंडमधील टी वॉर्ड कार्यालयात गुरुवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा झाला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी सर्व कर्मचाऱ्यांनी परेड केली. त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. 68 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यालयात फुलांच्या माळा आणि रांगोळी देखील काढण्यात आली होती. स्वच्छ भारत अभियानात टी वॉर्डला पहिल्या पाचमध्ये स्थान मिळाले आहे. त्याबद्दल सर्वांची प्रशंसा करत अतिरिक्त आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement