Coronavirus cases in Maharashtra: 354Mumbai: 181Pune: 39Islampur Sangli: 25Nagpur: 16Pimpri Chinchwad: 12Kalyan-Dombivali: 9Thane: 9Navi Mumbai: 8Ahmednagar: 8Vasai-Virar: 6Buldhana: 5Yavatmal: 4Satara: 2Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 16Total Discharged: 41BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

नाहीतर, शिवसेना भवन परिसरातला कचराच उचलणार नाही, सफाई कामगारांची भूमिका


नाहीतर, शिवसेना भवन परिसरातला कचराच उचलणार नाही, सफाई कामगारांची भूमिका
SHARE

मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन विभागातील कंत्राटी वाहन चालक आणि सफाई कामगार आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. या कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला असून त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास दादर परिसरातील जी-उत्तर विभागात काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.

 

यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक म्हणाले की, “मुंबईतील कचरा उचलणारे सफाई कामगार आणि कचरा गोळा करणाऱ्या गाडीचा चालक कंत्राटी कामगार असतात. कंत्राटदार त्यांचं अनेक प्रकारचं शोषण करतात. या कंत्राटी वाहन चालक आणि सफाई कामगारांना किमान वेतन सुविधा, भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी राज्य विमा सुविधा, वेतन पावती अशा कामगार कायद्यानुसार द्यावयाच्या किमान सुविधा मिळत नाहीत. महापालिकेत कार्यरत सर्व कंत्राटी कामगारांना ४६ टक्के लेव्हीचं अधिदान केलं जातं, परंतु कंत्राटदार त्याचंही पालन करत नाहीत. या कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही अनेकदा महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. पण अपेक्षित न्याय मिळाला नाही. त्यामुळे कंत्राटदार आणि महापालिका अधिकाऱ्यांना ‘जोर का झटका’ देण्यासाठी ‘काम बंद’ आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. सर्व संबंधित कामगार आमच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत.”

 

“ आंदोलनाअंतर्गत जी-उत्तर विभागातला म्हणजेच दादर परिसरातला कचरा अजिबात उचलला जाणार नाही, आणि त्यामुळे जे काही परिणाम होतील त्यास नफेखोर कंत्राटदार आणि कर्तव्यच्युत महापालिका अधिकारीच जबाबदार असतील”, असंही नाईक यांनी स्पष्ट केलं. 

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या पुढाकाराने ह्यासंदर्भातील एक महत्वपूर्ण बैठक शुक्रवार २२ नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या जी/उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तांसोबत होणार आहे. ह्या बैठकीतही कामगारांच्या मागण्यांवर सन्मानजनक तोडगा न निघाल्यास ‘काम बंद’ आंदोलन पुकारण्याशिवाय आमच्यासमोर कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही, असंही मनसेच्या केतन नाईक यांनी सांगितलं.  

 

असंख्य समस्यांना तोंड देत शेकडो वाहन चालक आणि स्वच्छक कामगार रोज किमान १०-१२ तास राबतात आणि त्यांच्यामुळेच आपली मुंबई, आपला परिसर स्वच्छ राहतो. पण दुर्दैवाने पैशाला चटावलेले नफेखोर कंत्राटदार आणि असंवेदनशील प्रशासकीय अधिकारी ह्यांमुळे स्वच्छक कामगारांना न्याय मिळण्यास अक्षम्य दिरंगाई होत आहे. 

- केतन नाईक, चिटणीस, मनसे  हेही वाचा-

मुंबईत अवघे १५ वाहनतळ, लाखो वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न कायम

अंधेरीत जलवाहिनी फुटली, स्थानिकांची गैरसोयसंबंधित विषय
ताज्या बातम्या