Advertisement

महापालिकेचं देशातलं पहिलं आपत्ती प्रतिसाद पथक तयार


महापालिकेचं देशातलं पहिलं आपत्ती प्रतिसाद पथक तयार
SHARES

मुंबई महापालिकेचं देशातील पहिलं आपत्ती प्रतिसाद पथक (सीडीआरएफ) तयार झालं आहे. कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरीत प्रतिसाद, उपाययोजना आणि सज्जतेसाठी ठोस पावलं उचलणे या आपत्ती प्रतिसाद पथकाचं काम असेल. त्यासाठी सुरक्षा दलातील २०० अधिकारी/जवान, वैद्यकीय अधिकारी, अग्निशमन अधिकारी व आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केलं जात आहे. पुढील महिन्यात हे सर्व पथक प्रशिक्षण घेऊन आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज होणार आहे.


कार्यक्रमाचं उद्घाटन

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे मंगळवारी शहर आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं उदघाटन अतिरिक्त महापालिका आयुक्त आय. ए. कुंदन यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रशिक्षणामध्ये ३० महिला व १७० पुरुष सुरक्षा रक्षकांचा समावेश असून हे सर्व सुरक्षा रक्षक २५ ते ३० या वयोगटातील आहेत.


कुठलं प्रशिक्षण?

एका महिन्यात एक तुकडी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणार आहे. या सर्वांना रासायनिक, जैविक, अणुनैसर्गिक व आण्विक आपत्तीं हाताळण्याकरिता उपलब्ध करुन देण्यात येणारी यंत्रसामुग्री वापरण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसंच कोसळलेल्या बांधकामात अडकलेल्या लोकांचे विमोचन व बचाव नागरी विमोचन व बचाव नागरी विमोचन व बचाव पाठयक्रम, पूराच्या पाण्यातून बचाव,सर्व प्रकारच्या नैसर्गिक तथा मानवनिर्मित्त आपत्तींस द्यावयाच्या प्रतिसाद स्तराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण उद्घाघाटन प्रसंगी बोलतांना अतिरिक्त आयुक्त आय.ए. कुंदन यांनी, हे पथक म्हणजे देशासाठी एक आदर्श पथक असेल असा आशावाद व्यक्त केला. मुंबई महानगरपालिका आपले नागरी दायित्व पार पाडत असताना ते विविध अंगाने काम करत आहे. शहर आपत्ती प्रतिसाद पथक आज देशात पहिल्यांदा मुंबईत साकारत असताना प्रशासने मोठे पाऊल उचलेले आहे. तेव्हा प्रतिसाद पथकातील सदस्याने आपले दायित्व लक्षात घेऊन कर्तव्य पार पाडावे आणि एक देशात सक्षम पथक म्हणून नावाजलं जावं, अशी अपेक्षा कुंदन यांनी व्यक्त केली.

या उद्घाटनप्रसंगी एफ दक्षिण/एफ उत्तर प्रभाग समितीचे अध्यक्ष सचिन पडवळ, उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) डॉ किशोर क्षिरसागर, वैद्यकिय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे, मुंबई अग्निशामन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे, सुरक्षा दलाचे प्रमुख अधिकारी दत्तात्रय पाटील, उपप्रमुख समादेशक (एन.डी.आर.एफ) सचिदानंद गावडे, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर आदी उपस्थित होते.



हेही वाचा-

अग्निशमन दलाकडे ५ हजारांहून अधिक स्वयंसेवकांची फौज, तरीही आगी लागण्याच्या घटना



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा