Advertisement

कापण्यापूर्वीच 'त्या' झाडाने घेतले दोघांचे बळी

एमजी रोडवरील होम गार्डच्या कार्यालयाशेजारी असलेल्या पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी कोसळून पाच जण जखमी झाले होते. यामध्ये ७४ वर्षीय परशुराम बस्तीन या ज्येष्ठ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला होता. यामध्ये एक ६० वर्षाचे राजेंद्र सिंग हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर जीटी रुग्णालयात उपचार सुरू होता. या व्यक्तीचाही सोमवारी मृत्यू झाला. तर तिघा जखमींवर उपचार सुरू आहेत.

कापण्यापूर्वीच 'त्या' झाडाने घेतले दोघांचे बळी
SHARES

रविवारी संध्याकाळी मेट्रो सिनेमा परिसरातील एमजी रोडवरील पिंपळाच्या झाडाची फांदी तुटून पडल्याने एकाचा मृत्यू आणि ४ जण जखमी झाले होते. परंतु, त्यातील गंभीर जखमी असलेल्या राजेंद्र सिंग नावाच्या ६० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकानेही सोमवारी जीव सोडला. आता दोन जणांचे जीव घेणारे हे झाड महापालिका रस्ते रुंदीकरणात कापणार आहे. त्यासाठी नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात येत आहेत. परंतु, या रुंदीकरणात आपला बळी जाण्यापूर्वीच त्या झाडाने दोघांचे बळी घेऊन टाकले.

तिघा जखमींवर उपचार सुरू

एमजी रोडवरील होम गार्डच्या कार्यालयाशेजारी असलेल्या पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी कोसळून पाच जण जखमी झाले होते. यामध्ये ७४ वर्षीय परशुराम बस्तीन या ज्येष्ठ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला होता. यामध्ये एक ६० वर्षाचे राजेंद्र सिंग हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर जीटी रुग्णालयात उपचार सुरू होता. या व्यक्तीचाही सोमवारी मृत्यू झाला. तर तिघा जखमींवर उपचार सुरू आहेत.

म्हणून 'हे' झाड कापणार

एमजी रोडच्या रुंदीकरणाचं काम महापालिकेने हाती घेतलं आहे. या रुंदीकरणात या पिंपळाच्या झाडासह अन्य झाड बाधित होत होती. त्यामुळे हे झाड कापण्याचा निर्णय घेत महापालिकेनं आयुक्तांच्या अधिकारात परवानगी मागितली होती. 

दरम्यान न्यायालयाने या आयुक्तांच्या अधिकारात झाडे कापण्याच्या निर्णयालाच स्थगिती दिल्यामुळे हे झाड कापण्याचं राहून गेलं. परंतु, त्यानंतर न्यायालयानं कापण्यात येणाऱ्या झाडाचा फोटो प्रसिद्ध करून जनतेकडून हरकती आणि सूचना मागवण्याचे निर्देश दिल्यामुळे महापालिकेने नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यासाठी जाहिरात दिली होती, असं ए विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केलं.

या हरकती आणि सूचनांची मुदत ३० जूनपर्यंत आहे. परंतु, ही मुदत संपण्यापूर्वीच या झाडाची फांदी पडून दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे हरकती आणि सूचना जाणून घेऊन झाड कापण्यासंदर्भातील पुढील कार्यवाही केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा