जोगेश्वरीत पाइपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया

Jogeshwari, Mumbai  -  

जोगेश्वरी पूर्व भागातील विक्रोळी लिंक रोडवरील मजास डेपोजवळ पाण्याची पाइपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया जात आहे.
या घटनेचा प्रत्यक्षदर्शी महेंद्र विश्वकर्माने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी 9 च्या दरम्यान पिण्याच्या पाण्याची पाइपलाईन फुटली. मात्र महानगरपालिकेचा कोणताही कर्मचारी तिथे तासाभरात पोहचला नाही.
एकीकडे उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे आणि पाण्याची अशा प्रकारे नासाडी होत असताना देखील त्याकडे महानगरपालिकेतील कोणाचेच लक्ष नसल्याने स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Loading Comments