Advertisement

प्लास्टिक बंदीच्या कार्यक्रमात अजय-काजोल प्रमुख पाहुणे


प्लास्टिक बंदीच्या कार्यक्रमात अजय-काजोल प्रमुख पाहुणे
SHARES

राज्यात प्लास्टिक बंदी करण्यात येत असल्यामुळे प्लास्टिकला पर्याय म्हणून राबवण्यात येणाऱ्या वस्तुंचं भव्य प्रदर्शन वरळीतील नॅशनल स्पोुर्टस् क्लरब ऑफ इंडिया (एनएससीआय)मध्ये भरवलं जाणार आहे. या प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोलला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात येत आहे. महापालिकेने या दोघांनाही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं आहे.


याकरता भरवणार प्रदर्शन

महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याच्यावतीने ‘घन कचरा प्रक्रि‍या आणि साधनांचं भव्य प्रदर्शन’ मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) तर्फे भरवण्यात आलं होतं. त्यानंतर आता येत्या काही दिवसांमध्ये प्लास्टिक बंदीनंतर पर्यायी उपाययोजना आणि त्यासाठीचा वापर याकरताही प्रदर्शन भरवलं जाणार आहे. या प्रदर्शनामध्ये प्लास्टिकला पर्याय ठरणाऱ्या कागदी तसेंच कापडी पिशव्यांसह अन्य उत्पादकांचे स्टॉल्स लावले जाणार आहेत.


काटेकोर अंमलबजावणी कधीपासून?

राज्यात सध्या प्लास्टिक बंदी जाहीर करण्यात आली असून याची काटेकोर अंमलबजावणी २३ जूनपासून केली जाणार आहे. या दिवसांपासून प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणारा आणि उपलब्ध करून देणारा या दोघांवरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यापूर्वी पर्यायी वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी जनजागृतीचा भाग म्हणून हे प्रदर्शन भरवलं जाणार असल्याचं महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून समजतं. या प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांना निमंत्रित केलं जात असल्याचंही समजतं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा