शताब्दी रुग्णालयात 'उंदीर पकडो मिशन'


SHARE

कांदिवली पश्चिमेकडील शताब्दी रूग्णालयातील वाॅर्डबाॅय, आया किंवा इतर आरोग्य कर्मचारी रुग्णांची देखभाल करायचं सोडून उंदीर पकडताना दिसल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका... कारण त्यांचाही नाईलाज आहे... रुग्णालयात उंदीरच एवढेच झालेत... की या कर्मचाऱ्यांना आता रुग्णांच्या मागं धावायचं सोडून उंदराच्या मागं धावावं लागत आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी तसे आदेशच दिलेत म्हणे...


का दिले असे आदेश? 

२९ सप्टेंबर आणि ८ आॅक्टोबर रोजी रुग्णालयातील दोन महिला रुग्णांना उंदीर चावल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर सर्वत्र शताब्दी रुग्णालयातील अस्वच्छतेची चर्चा व्हायला लागली. यापूर्वीही अशा घटना घडल्या होत्या याकडं लक्ष वेधण्यात आलं. रुग्णांच्या आरोग्यासंदर्भात मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. या टीकेनंतर महापालिका प्रशासनही खडबडून जागं झालं. महापालिका अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी मंगळवारी रुग्णालयाची पाहणी करत उंदराच्या सुळसुळाटाला रोखण्यासाठी तातडीची उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 


कसा रोखणार उंदरांचा सुळसुळाट? 

  • रुग्णालयातील सर्व मल:निस्सारण पाईपांवर 'रॅट गार्ड' बसवणार
  • जेणेकरुन पाईपांवर चढून उंदीर रुग्णालयात येऊ शकणार नाहीत 
  • उंदीर पकडण्यासाठी ग्लू-पॅड, रॅट गार्ड, रॅट ट्रॅप (पिंजरा) ठिकठिकाणी लावणार
  • कचऱ्यात टाकावू अन्नपदार्थ फेकल्यावर उंदरांना सहज अन्न मिळतं
  • त्यामुळं रुग्णालयातील स्वच्छतेवर भर, क्लिनअप मार्शलद्वारे स्वच्छता 
  • उंदरांची बिळे तातडीने बंद करणार
  • खिडक्यांना जाळ्या बसवणार
  • रुग्णालयाची साफसफाई करणाऱ्या ९ हाऊस किंपींग यंत्रणा, ४ बहुउद्देशीय कामगार संस्थांना 'कारणे दाखवा नोटीस'
  • रुग्णांकडून पैसे मागण्याच्या तक्रारी रोखण्यासाठी १ सुरक्षारक्षक आणि १ कंत्राटी कामगाराची नेमणूकडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय