Advertisement

मुंबईकरांनो, तुम्हाला स्वच्छतेबाबत काय वाटतं? जाणून घेणार मुंबई महापालिका!

मुंबईतील स्वच्छता विषयक सर्वेक्षण, मोबाईल अॅप, तक्रार नोंदणी आणि तक्रार निवारण पद्धती या संदर्भातील माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांची पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी उपायुक्त विजय बालमवार तसेच सहायक आयुक्त किरण दिघावकर उपस्थित होते.

मुंबईकरांनो, तुम्हाला स्वच्छतेबाबत काय वाटतं? जाणून घेणार मुंबई महापालिका!
SHARES

मुंबईला स्वच्छतेत पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी महापालिकेनं पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आता थेट जनतेच्या दरबारात धाव घेऊन नागरिकांकडून स्वच्छतेबाबतची मतं जाणून घेण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. यासाठी महापालिकेनं एका खासगी संस्थेवर याची जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये नागरिकांची मते जाणून घेताना स्वच्छतेबाबतच्या मोबाईल अॅपचाही प्रसार केला जाणार आहे. यात मोबाईल अॅपचा वापर कशाप्रकारे करावा? याची माहिती देत नागरिकांना मोबाईल अॅपद्वारे स्वच्छतेबाबतच्या तक्रारी करण्याचं आवाहन केलं जाणार आहे.


यासाठी ‘गया स्मार्ट सिटी’ संस्थेची निवड

या कामासाठी ‘गया स्मार्ट सिटी’ या खासगी संस्थेची निवड करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून २५ प्रतिनिधी यात सहभागी होणार असून ३ ते ४ जणांचे एक पथक तयार करून मुंबईतील शाळा, कॉलेज, मंडई, मॉल, रुग्णालय तसेच सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांशी चर्चा करत स्वच्छतेबाबत लोकांची मतं जाणून घेतली जाणार आहेत.


…तर महापालिकेचा स्वच्छता अॅप डाऊनलोड करा

ही संस्था नागरिकांची स्वच्छतेची भूमिका जाणून घेताना त्यांना स्वच्छता अॅपचा वापर करण्याचं आवाहन करणार आहे. या अॅपच्या माध्यमातून मुंबईतील कोणत्याही भागात कचरा दिसल्यास त्याचा फोटो अपलोड केल्यावर पुढील १२ तासांमध्ये हा कचरा साफ झालेला दिसेल. त्यामुळे यासाठी मोबाईल अॅप डाऊनलोड करून त्याचा वापर करायचा, याचीही माहिती या पथकांच्या माध्यमातून दिली जाणार असल्याचं सिंघल यांनी सांगितलं. मोबाईल अॅपवर प्राप्त झालेल्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी महापालिकेचा स्वच्छता अॅप त्वरीत डाऊनलोड करावं आणि कचरा असल्यास त्याद्वारे तक्रार करावी, असं आवाहन सिंघल यांनी केलं आहे.


स्वच्छतेबाबत मंडई, हॉटेल, रुग्णालयांचं सर्वेक्षण

महापालिकेच्या सर्व मालमत्तांबरोबरच अन्य ठिकाणच्या स्वच्छतेचं सर्वेक्षण करण्यासाठी युनिटेक या संस्थेची निवड करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून सर्वेक्षण करून तेथील स्वच्छतेचं रँकिंग केलं जाणार आहे. यामध्ये मंडई, हॉटेल, रुग्णालय, मॉल्स आदींमध्ये ज्याप्रकारे स्वच्छता आढळून येईल, त्याप्रमाणे त्यांना रँकिंग दिलं जाणार आहे. या रँकिंग प्रमाणेच त्यांना प्रमाणपत्रही दिलं जाणार असल्याचं सिंघल यांनी सांगितलं.



हेही वाचा

आता पहा हातोहात जागेवरचं आरक्षण, महापालिकेचे देशातील पहिले मोबाईल अॅप!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा