इमारतीचे प्रवेशद्वार की खडतर रस्ता

 Dharavi
इमारतीचे प्रवेशद्वार की खडतर रस्ता
इमारतीचे प्रवेशद्वार की खडतर रस्ता
See all

कुंभारवाडा - सी विभागातील दुस-या कुभारवाड्यात पार्वती सदन इमारतीचं काम दोन महिन्यांपासून रखडलंय. इमारतीच्या प्रवेशद्वारात खोदकाम करून ठेवलंय. तसंच रस्त्यात सिमेंटच्या गोण्या ठेवल्या आहेत. त्यामुळे रहिवाशांना ये-जा करण्यास त्रास होत आहे. विद्युत तारा उघड्यावरच पडल्यात. त्यामुळे शॉक लागून जिवीतहानी होण्याची शक्यता आहे. नगरसेवक निधीतून हे काम करण्यात येतंय.

"आरोग्य शिबीर आयोजित करण्यापेक्षा इमारतीचं काम पूर्ण करायचं," असं इथले रहिवासी दीलीप चौरेसिया यांनी म्हटलं. तर "काही कारणास्तव काम बंद ठेवण्यात आले होतं. लवकरच काम सुरू करण्यात येईल," असं स्पष्टीकरण नगरसेवक युगंधरा साळेकरांनी दिलं.

Loading Comments