Advertisement

कोरोनामुळे रस्त्यावरील खड्ड्यंकडे महापालिकेचं दुर्लक्ष


कोरोनामुळे रस्त्यावरील खड्ड्यंकडे महापालिकेचं दुर्लक्ष
SHARES

मुंबईत दरवर्षी जस्तीचा पाऊस झाल्यास मोठ्या प्रमाणात पाणी साचतं. मुसळधार पावसामुळं मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण होतं. मात्र, महापालिकेकडून दरवेळेस खड्डे बुजवल्याचे दावे केले जातात. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती 'जैसे थे'च असते. यंदाही मुंबईत पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळं रस्त्यावर खड्डे पडले आहेत. परंतु, कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात संपूर्ण महापालिका यंत्रणा व्यस्त असल्यानं अन्य विकासकामांकडं दुर्लक्ष होत आहे.

मुंबईत पहिल्याच पावसात सखल भागात पाणी भरले. मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेला पुरेसा अवधी न मिळाल्यामुळं पावसाळ्यात मुंबईकरांची वाट बिकट होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत प्रवास करावा लागतो. तसेच खड्ड्यांमुळे काही अपघातही घडण्याची शक्यता आहे.

गतवर्षी ‘खड्डे दाखवा ५०० रुपये मिळवा’ अशी बक्षीस योजना महापालिका प्रशासनानं आणली होती. त्यावेळेस नागरिकांनी खड्ड्यांचे फोटो काढून पालिकेच्या अ‍ॅपवर पाठवले होते. नियमानुसार २४ तासांच्या आत न बुजवलेल्या खड्ड्यांसाठी संबंधित तक्रारदारांना ५०० रुपये बक्षीस देण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली होती.

यंदा मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी मुंबईत लॉकडाऊन करण्यात आले. तसेच महापालिकेची सर्व यंत्रणा, कर्मचारी, अधिकारी कोरोनाविरुद्ध लढ्यात व्यस्त झाले. याचा फटका पावसाळापूर्व कामांना बसला आहे. परिणामी पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेने ही सर्व कामे घाईघाईने आटोपली.

रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो काढून काही नागरिक मायबीएमसी पॉटहोलफिक्स साइटवर पाठवत आहेत. यामध्ये महापालिका विभाग कार्यालय, रस्ते विभाग तसेच अन्य प्राधिकरणाच्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.हेही वाचा - 

कल्याण-डोंबिवलीत बुधवारी ४७१ नवे रुग्ण

दहीसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि मुलुंड या भागात रुग्ण वाढीचा दर अधिकRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा