Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,44,710
Recovered:
56,85,636
Deaths:
1,16,026
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,807
666
Maharashtra
1,39,960
9,830

महापौरांनीच तोडला वाहतूक नियम, दंडवसुली कधी?

मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीच महापालिकेचा नियम धाब्यावर बसवत ‘नो पार्किंग झोन’मध्ये गाडी पार्क केल्याचं समोर आलं आहे.

महापौरांनीच तोडला वाहतूक नियम, दंडवसुली कधी?
SHARES

मुंबईत ‘नो पार्किंग’ झोनच्या नावाखाली वाहतूक विभागाकडून जबर दंडवसुली सुरू आहे. वाहन चालकांनी चुकीने जरी या ‘झोन’मध्ये गाडी पार्क केल्यास त्यांना मुकाटपणे खिशात हात हालून दंडाची रक्कम भरावी लागत आहे. असं असताना खुद्द मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीच महापालिकेचा नियम धाब्यावर बसवत ‘नो पार्किंग झोन’मध्ये गाडी पार्क केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांकडून सक्तीने दंड वसूल करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांनी महापौरांच्या गाडीवर कारवाई करण्याचं मात्र टाळलं आहे. 

इतका दंड

मुंबई  महापालिकेचं वाहनतळ असलेल्या ५०० मीटर अंतर परिसराच्या आत वाहन पार्क केल्यास ५ हजार रुपयांपासून २५ हजार रुपयांपर्यंत दंडवसुली केली जात आहे.  मुंबईत दररोज शेकडो वाहनं रस्त्यावर उतरत असून वाहनांची संख्या ३३ लाख ५२ हजारांवर गेली आहे. वाहन चालक मनमानी पद्धतीने रस्त्याच्या कडेला गाड्या अनधिकृतरित्या पार्क करत असल्याने शहरात वाहतूककोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. 

गाड्या पार्क कशा करणार?

त्यामुळे पार्किंगला शिस्त लावण्यासाठी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या निर्देशानुसार ७ जुलैपासून नो पार्किंग झोनमध्ये गाड्या उभ्या करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र महापालिकेकडे उपलब्ध असणार्‍या वाहनतळांवर केवळ ३४ हजार ८०८ वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था असताना एखाद्या वाहनतळ क्षेत्रात एकाच वेळी हजारो गाड्यात आल्यास त्या कशा पार्क करणार ? असा प्रश्न उपस्थित करत वाहन चालक या निर्णयाला विरोध करत आहेत.  

मुंबईकरांमधून संताप

त्यातच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईतल्या मालवणी अस्वाद हॉटेलबाहेर नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क करून महापालिकेच्याच नियमांचं उल्लंघन केलं. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही महापौरांकडून दंड न वसूल केल्याने मुंबईकरांमधून संताप व्यक्त केला जात आहे. महापौरांना महापालिकेचे नियम लागू होत नाहीत का? मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांनीच कायदे मोडल्यास कसं चालणार? असे प्रश्न मुंबईकरांकडून उपस्थित केले जात आहेत. 

सोबतच महापालिका सभागृहात हा मुद्दा तापण्याची चिन्हे असून या मुद्द्यावरून विरोधक महापौरांना धारेवर धरण्याची चिन्हे आहेत. हेही वाचा-

‘नो पार्किंग’चा जबर दंड की तोंड दाबून बुक्क्यांचा मार?

मुंबईत अवैध पार्किंग केल्यास १० हजार रुपयांपर्यंत दंडRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा