Advertisement

माहिम: पालिका आणि प्ले अॅण्ड शाईन फाऊंडेशन तर्फे 'बीच क्लिनअप'चे आयोजन

पर्यावरणप्रेमींनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

माहिम: पालिका आणि प्ले अॅण्ड शाईन फाऊंडेशन तर्फे 'बीच क्लिनअप'चे आयोजन
SHARES

देशाला समृद्ध असा सागरी इतिहास आहे. ऋग्वेदासारख्या प्राचीन ग्रंथांमध्येही सागराच्या उपयुक्ततेचा उल्लेख आहे. भारतीय साहित्याद्वारे साग, नदी-नाले, निसर्ग यांचा समन्वय अध्यात्माच्या संकल्पनेशी साधला गेला आहे. पण अलिकडे पर्यटनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर किनारपट्ट्यांवर कचरा साचत आहे. सागरी जीवांची अन्नसाखळी आणि सागरी विश्वाला मानवी हस्तक्षेपाचा मोठा फटका बसत आहे.

समुद्र किनाऱ्यांवर दिवसेंदिवस होणारी अस्वच्छता चिंतेंचा विषय आहे यात काही शंका नाही. पण बऱ्याच पर्यावरण प्रेमी पुढाकार घेत हेच चित्र पालटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना पालिका आणि पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्थाही या मोहीमेत सहभागी होत आहेत. त्यापैकीच एक आहे, प्रेसिडेन्ट प्ले अॅण्ड शाईन फाऊंडेशन.

बृहन्मुंबई महानगरपालिका व प्ले अॅण्ड शाईन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बीच क्लिनअपचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच "चॅरिटी बीच व्हॉलीबॉल टुर्नामेंट"चे आयोजन शनिवार १९ नोव्हेंबर म्हणजेच शनिवारी आयोजित केले आहे.

स्वच्छता मोहीम यासोबतच आम्हाला क्रीडा उपक्रमांना (Sports) प्रोत्साहन द्यायचे आहे. त्यामुळे आम्ही स्वच्छता मोहीमेनंतर व्हॉलीबॉल टुर्नामेंटचे आयोजन केले आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रेसिडेन्ट प्ले अॅण्ड शाईन फाऊंडेशनचे सार्थक वाणी यांनी केले आहे.

ठिकाण : माहिम चौपाटी (रेती बंदर), मुंबईहेही वाचा

मध्य रेल्वेवर २७ तासांचा ब्लॉक, शनिवार-रविवारी धावणार बेस्टची विशेष बस सेवा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा