Advertisement

आचारसंहितेपूर्वी पालिकेचा प्रस्तावांचा सपाटा; १३०० कोटींचे प्रस्ताव पारित

आचारसंहितेपूर्वीच मुंबई महानगरपालिकेच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्याचा सपाटा लागला आहे. आचारसंहितेपूर्वी बैठकीत १३३० कोटींचे प्रस्ताव मंजूर झाल्याची महिती समोर आली आहे.

आचारसंहितेपूर्वी पालिकेचा प्रस्तावांचा सपाटा; १३०० कोटींचे प्रस्ताव पारित
SHARES

येत्या काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आचारसंहितेपूर्वीच मुंबई महानगरपालिकेच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्याचा सपाटा लागला आहे. आचारसंहितेपूर्वी बैठकीत १३३० कोटींचे प्रस्ताव मंजूर झाल्याची महिती समोर आली आहे. 


चर्चेशिवाय प्रस्ताव मंजूर

गेल्या आठवड्याभरात पालिकेच्या झालेल्या बैठकांमध्ये कोणत्याही चर्चेविना १३३० कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये नाले आणि सिवरेज लाईनची सफाई, रस्त्यांची डागडुजी, पाण्याच्या लाईनची दुरूस्ती, पाण्याचं शुद्धीकरण अशा अनेक योजनांचा समावेश आहे. यापूर्वी २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही पालिकेने ७०० कोटी रूपयांच्या ८० प्रस्तावांना मंजुरी दिली होती. 


शुक्रवारी बैठक ?

शुक्रवारी पालिकेच्या स्थायी समितीची बैठक आयोजित होऊ शकते. तसंच या बैठकीत अनेक प्रस्ताव पारित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहिल्यांदाचा मोठ्या प्रमाणात प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली नाही. अनेक बैठकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रस्ताव मंजुर होतात. हे प्रस्ताव शहराच्या विकासासाठी आणि पायाभूत सुविधांमधील बदलांसाठी असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली.




हेही वाचा - 

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत 'युपीएससी'चे प्रशिक्षण

राहुल यांचं आश्वासन जुमलेबाजी नाही; संजय निरूपम यांचा दावा




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा