राहुल यांचं आश्वासन जुमलेबाजी नाही; संजय निरूपम यांचा दावा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ५०० चौरस फुटांच्या घरांचं दिलेलं आश्वासन हा 'चुनावी जुमला' नसल्याचं स्पष्टीकरण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी मंगळवारी दिलं.

SHARE

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ५०० चौरस फुटांच्या घरांचं दिलेलं आश्वासन म्हणजे 'चुनावी जुमला' नसल्याचं स्पष्टीकरण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी मंगळवारी दिलं. मुंबईत काँग्रेसच्या पार पडलेल्या सभेत राहुल गांधी यांनी काँग्रेस सत्तेत आल्यास झोपडपट्टीवासीयांना ५०० चौरस फुटांचं घर देण्याचं आश्वासन दिलं होतं. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत निरूपम यांनी ही माहिती दिली.


काय म्हणाले निरूपम ?

काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, राज्यातील काही माजी मंत्री, काही निवृत्त अधिकारी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ या योजनेचे फिजिबलीटी रिपोर्ट तयार करत असल्याची माहिती निरूपम यांनी दिली. तसंच पक्षाला याचा फायदा होण्यासाठी काँग्रेस हा मुद्दा सर्वांपर्यंत पोहोचवणार असल्याचंही ते म्हणाले.


जागेची कमतरता

मुंबईत एसआरए स्कीमची सुरुवात पहिल्यांदा काँग्रेसनंच केली. तसंच मुंबईत जागेची कमतरता भासत आहे हे सर्वांना माहित आहे. यासाठी बहुमजली इमारती तयार करून सर्वांना घरं मिळवून देणं शक्य असल्याचं निरूपम यांनी सांगितलं. एफएसआय वाढवून हे काम करणं शक्य आहे. यापूर्वी एसआरए अंतर्गत १६० चौरस फुटांची घरं मिळत होती. त्यानंतर २६९ चौरस फुटांची घरं मिळायला लागली. अशा परिस्थितीत ५०० चौरस फुटांचं घर देणंही शक्य असून ते काम केवळ काँग्रेसच करू शकते, असं विश्वास निरूपम यांनी व्यक्त केला. 
हेही वाचा - 

बहुचर्चित उदानी हत्येप्रकरणात आरोपींवर दोषारोपपत्र दाखल

पबजीचं फॅड, भावी पिढीला करतंय मॅड
संबंधित विषय
ताज्या बातम्या