बेकायदा झोपड्यांवर पालिकेचा हातोडा

 Govandi
बेकायदा झोपड्यांवर पालिकेचा हातोडा
बेकायदा झोपड्यांवर पालिकेचा हातोडा
See all

गोवंडी - देवनार क्षेपणभूमीलगत असलेल्या रफिकनगर भागात मनपाच्या एम पूर्व विभागाने कारवाई केली. या कारवाईत नाल्याशेजारी बांधण्यात आलेल्या 20 बेकायदा झोपड्या पाडण्यात आल्या. झोपडीधारकांना पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार पात्र झोपड्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे. बेकायदा झोपड्यांना पाच दिवस आधी पूर्वसूचना देऊन त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. नाले रुंदीकरणात या झोपड्या अडथळा ठरत होत्या. त्यामुळे या हटवणे आवश्यक होते. एम पूर्व विभागातील एकूण 15 नाल्यांचे रुंदीकरण होणार आहे. त्या नाल्याशेजारी असलेल्या झोपड्या अशाच प्रकारे हटवून नाले रुंदीकरणाचे काम करण्यात येईल, अशी माहिती एम पूर्व विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

Loading Comments