• अनधिकृत घरांवर पालिकेचा हातोडा
SHARE

कांदिवली - समतानगरमधील म्हाडा वसाहतीच्या अनधिकृत वाढीव बांधकामांवर कारवाई सुरूये. गुरुवारी पालिकेच्यावतीनं म्हाडा वसाहतीच्या या वाढीव बांधकामावर कारवाई करण्यात आली आणि रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. पालिकेच्या या तोडक कारवाईचा रहिवाशांनी तीव्र विरोध करत पालिका प्रशासनाचा निषेध केला.

पालिकेच्या या तोडक कारवाईचा निषेध फक्त रहिवाशांनीच केला नाही तर स्थानिक नगरसेवक योगेश भोईर यांनी देखील केला. कारवाई करताना रहिवाशांना विश्वासात का घेतलं गेलं नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एका स्वयंसेवी संस्थेनं उच्च न्यायालयात या अनधिकृत बांधकामासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयानं दिल्यानं पालिकेला ही तोडक कारवाई करावी लागली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या