Advertisement

अग्निसुरक्षा नियमाचं उल्लंघन कराल, तर व्यावसायिक परवान्याला मुकाल


अग्निसुरक्षा नियमाचं उल्लंघन कराल, तर व्यावसायिक परवान्याला मुकाल
SHARES

कोणत्याही व्यवसायाला परवाना दिल्यानंतर त्या विभागातील संबंधित सहायक अभियंता (इमारत व कारखाने) व अग्निसुरक्षा पालन अधिकारी व्यवसायाच्या ठिकाणाला भेट देऊन तेथील अग्निसुरक्षेची तपासणी करतील. या तपासणीत व्यावसायिकाने अग्निसुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळल्यास व्यावसायिकाचा परवाना त्वरीत रद्द करण्यात येईल. एवढंच नाही, तर त्याने जे शुल्क अनामत म्हणून भरले आहे, ते देखील जप्त करण्यात येईल, असे सक्तीचे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत.


नियमांमध्ये बदलाची शिफारस

कमला मिलमधील आगीसंदर्भात अजोय मेहता यांच्या चौकशी समितीने हॉटेल्सवरील कारवाईसाठी महापालिकेच्या नियमांमध्येच बदल करण्याची शिफारस केली आहे. हॉटेलची परवाना प्रक्रिया, अग्निसुरक्षा नियमांचं उल्लंघन तसेच परवान्याशिवाय व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करण्यासाठी महापालिका अधिनियम कलम ३९४, कलम ४७१ व कलम ४७२ मध्ये सुधारणा करण्याची शिफारस आयुक्तांनी केली आहे.


परवाना आपोआप रद्द होणार

उपहारगृहांना (हॉटेल) परवाना देतानाच काही अटी शर्ती घालून देण्यात येतात. त्यामुळे जर सलग तीन तपासणी अहवालांमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्यास किंवा वर्षांतून दोनदा जप्तीची कारवाई झाल्यास संबंधित हॉटेलचा परवाना आपोआपच रद्द होणार आहे. महापालिका आयुक्तांनी आपल्या चौकशी अहवालात या तरतूदी नमूद करत हॉटेल्सवाल्यांना सक्तीचे नियम सुचवले आहेत.



हेही वाचा-

हॉटेलच्या किचनमध्ये झोपल्यास परवाना रद्द

अंडी किंवा सरबत काहीही विका; परवाना घ्यावाच लागेल!

साकीनाका आग दुर्घटना: सहायक आयुक्तांसह परवाना आणि आरोग्य अधिकाऱ्यांवर होणार कारवाई


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा