नव्या फुटपाथचा घाट का?

 Chembur
नव्या फुटपाथचा घाट का?

चेंबूर - दोन वर्षांपूर्वी बांधलेला फुटपाथ तोडून नवा फुटपाथ बांधण्याचा घाट चेंबूरच्या सुभाषनगर परिसरात पालिकेकडून घातला जात आहे. पालिका निवडणूक जवळ आल्यानेच अशा विकासकामांचे घाट नगरसेवक घालत आहेत की काय असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. दिखावा करण्यासाठीच स्थानिक नगरसेविकेचे हे काम सुरू असून, यामध्ये सामान्यांचा पैसा पालिका कंत्राटदारांच्या घशात घालत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी रमेश खवळे यांनी केला. याबाबत पालिका आयुक्तांना तक्रार करणार असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.

Loading Comments