इमारतीवरील होर्डिंगआड जरीचा कारखाना, महापालिकेची कारवाई

  Sandhurst Road
  इमारतीवरील होर्डिंगआड जरीचा कारखाना, महापालिकेची कारवाई
  मुंबई  -  

  बी विभागातील मांडवी पोस्ट ऑफिसजवळील इमारतीवर मागील अनेक वर्षांपासून एक होर्डिंग लावलेले होते. या होर्डिंगपासून महापालिकेला कुठल्याही प्रकारचे उत्पन्न मिळत नव्हते, उलट पोस्ट ऑफिसवर या होर्डिंगचा मोठा भार पडत होता. त्यामुळे या अनधिकृत होर्डिंगवर हातोडा चालवून महापालिकेने ते काढून टाकले.

  हे होर्डिंग काढून टाकताच होर्डिंगआड जरीचा कारखाना चालत असल्याचे महापालिकेच्या निर्दशनास आले. टेरेसवर हा कारखाना सुरू असल्याने सहाय्यक आयुक्तांनी या कारखान्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.


  कर भरण्यास टाळाटाळ

  या होर्डिंगचा कर भरण्यासंदर्भात महापालिकेने डिसेंबर २०१६ मध्ये संबंधि‍त मालकाला अनेकदा नोटीस बजावल्या. तरीही होर्डिंग मालक कर भरण्यास टाळाटाळ करत असल्याने बी विभागाचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी या होर्डींगवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला दिले.  टेरेसवर अनधिकृत बांधकाम

  या इमारतीच्या टेरेसचे निरीक्षण केल्यानंतर इमारतीच्या मालकाने येथे एक लहान तर दोन मोठ्या खोल्या, दोन बाथरुम असे अनधिकृत बांधकाम केल्याचे दिसून आले. या अनधिकृत खोल्यांमध्ये १०-१२ मजुरांच्या मदतीने इमारत मालक बऱ्याच वर्षांपासून कापडावरील जरीचे काम करत असल्याचे निदर्शनास आले.

  हे अनधिकृत बांधकाम आणि कारखाना महापालिकेच्या निदर्शनास येऊ नये म्हणून इमारत मालकाने जाणीवपूर्वक महापालिका कर्मचाऱ्यांना यापासून लांब ठेवले. पण सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी टेरेसवरील उपरोक्त अनधिकृत बांधकामाची पाहणी करुन त्यावर त्वरीत कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.  हे देखील वाचा -

  मुंबई महापालिकेची 125 वर्ष जुनी चावी तुटली!
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.