Advertisement

अनधिकृत केबल वायरीवर पालिकेची कारवाई

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं २७ फेब्रुवारीपासून विशेष मोहीम सुरू केली आहे.

अनधिकृत केबल वायरीवर पालिकेची कारवाई
(BMC Official Twitter)
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं २७ फेब्रुवारीपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत झाडे, मोनोरेल खांब आणि इतर सर्व ठिकाणी लोमकळणाऱ्या अनधिकृत केबल वायरी काढून टाकण्याचं काम हाती घेतलं आहे. २.० किमीवरील अनधिकृत केबल्स आणि डेंगलिंग ओव्हरहेड यूटिलिटी वायर काढून टाकण्याची कारवाई सुरू केली आहे.

D वॉर्ड इथल्या (मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड आणि चर्नी रोड भागातील) पथकांवरील वायरी काढण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रीशियनची भेट घेतली. शिवाय, प्रशासन यासाठी ड्राइव्ह चालविण्याची योजना आखत आहे. या कारवाईचे राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने कौतुक केले.


आदित्य ठाकरे म्हणाले की, "ही मोहीम शहर आणि उपनगर सुशोभिकरण मोहिमेचा एक भाग आहे. पालिकेचे सर्व प्रभाग बेकायदा ओव्हरहेड वायर काढून टाकणार आहेत.

पालिकेच्या नियमात स्पष्टपणे म्हटलं आहे की, ओव्हरहेड केबल्स बेकायदेशीर आहेत आणि आवश्यक परवानग्या घेतल्यानंतर ते भूमिगत ठेवले पाहिजेत. गेल्या काही महिन्यांपासून सर्व्हिस प्रदात्यांना वारंवार भूमिगत केबल्स घेण्यास वारंवार विचारणा केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

डेंगलिंग ओव्हरहेड केबल्सचा मोटार वाहनं तसंच पक्ष्यांना जास्त धोका आहे. परंतु त्यामध्ये रस्ता खोदणे आणि पुनर्स्थापनेचा समावेश नसल्यामुळे खंदकापेक्षा जास्त प्राधान्य दिले जाते.Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा