Advertisement

अन् बाप्पांनीच जाता जाता बुजवले खड्डे !


अन् बाप्पांनीच जाता जाता बुजवले खड्डे !
SHARES

विक्रोळी पार्क साईटमधील रोड क्रमांक १ वर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली होती. गणेश विसर्जनावेळी खड्ड्यांमुळे मूर्तीला धक्का पोहोचण्याची भीती असल्याने येथील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी एकत्र येऊन खड्डे बुजवेपर्यंत मूर्तींचे विसर्जन न करण्याचा इशारा महापालिकेला दिला. अखेर, मंडळांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर महापालिकेची यंत्रणेला जाग येऊन या मार्गावरील सर्व खड्डे युद्धपातळीवर बुजवण्यात आले.



विक्रोळी पार्क साईटमधील रस्त्यांवर खड्डे असल्यामुळे मागील दहा दिवसांपासून रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी महापालिकेला खड्डे बुजविण्यासाठी विनंती करण्यात येत होती. परंतु अधिकारी या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने या खड्डेमय रस्त्यांवरूनच बाप्पांची विसर्जन मिरवणूक काढण्याची वेळ मंडळांवर आली होती. या खड्डयांमुळे गणेश मूर्तीला धक्का पोहोचण्याची शक्यता असल्याने येथील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मूर्तींचे विसर्जनच न करण्याचा इशारा महापालिकेला दिला. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्वरीत खड्डे बुजवले.

महापालिकेचे अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे नाईलाजास्तव हा इशारा द्यावा लागला होता. या खड्डयातून विसर्जन मिरवणूक काढताना मूर्तीला धक्का पोहोचला, तर जबाबदार कोण? हाच आमचा प्रश्न होता. परंतु, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी खड्डे त्वरीत बुजवल्यामुळे येथील सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असल्याचे, शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा