Advertisement

मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी, महापालिकेच्या सूचना जारी

यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून १० जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता पालिकेनं मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी, महापालिकेच्या सूचना जारी
(File Image)
SHARES

मुंबईत रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवसादिवशी वारंवार विनंती, आवाहने करुनही मुंबईकर आणि इतर पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यास जातात, तसेच बीचवर पोहण्यास जातात. 

यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून १० जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता पालिकेनं मोठा निर्णय घेतला आहे. 

रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना कोणीही समुद्रकिनारी, बीचेसवर फिरण्यास किंवा पोहण्यास जायला प्रशासनाकडून प्रतिबंध करण्यात आला आहे. या संबंधित मुंबई महापालिका प्रशासनाने एक पञक जारी केलं आहे. 

रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी केवळ सकाळी 6 ते 10 या वेळेतच समुद्रकिनारी जाण्यास परवानगी असेल. त्यानंतर बीचेसवर कुणीही फिरकु नये अशी सूचना महापालिका प्रशासनाने दिली आहे. 

दरम्यान, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात 15 एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा